स्मार्ट प्रीपेड मीटरला रायगड जिल्ह्यातील वीज ग्राहकाचा प्रचंड विरोध

वीज ग्राहकांच्या घरात स्मार्ट प्रीपेड मीटर बसू देणार नाही :-उल्काताई महाजन सर्वहारा जनआंदोलन नेत्या

 रोहा कार्यकारी अभियंता प्रदीप दाळू यांना वीज ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर न बसविण्याचे निवेदन

  रोहा (प्रतिनिधी)  महावितरण कंपनीच्या वीज ग्राहकांना रायगड जिल्ह्यातील रोहा,माणगाव,तळा,अलिबाग व मुरुड तालुक्यात वीज ग्राहकांना न विचारता जुने चांगले मीटर बदलून स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्यात येत आहे. मिटर लावण्यास प्रचंड विरोध रायगड जिल्ह्यातील वीज ग्राहकाचा आहे.जनतेचा विरोध लक्षात घेऊन सर्वहारा जन आंदोलनाच्या वतीने रायगड जिल्हातील वीज ग्राहकांचा मेळावा दि.१२.८.२०२५ रोजी पंचायत समिती सभागृह रोहा येथे स्मार्ट प्रीपेड मीटर विरोधी कृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी कॉम्रेड उल्का महाजन संस्थापिका सर्वहारा जन आंदोलन रायगड ह्या होत्या.प्रमुख मार्गदर्शक कॉम्रेड कृष्णा भोयर सरचिटणीस महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन व आयटक राज्य सचिव,कॉम्रेड भारती भोयर अध्यक्ष महिला आघाडी,कॉम्रेड सोपान सुतार अध्यक्ष,कॉम्रेड चंद्रकांत गायकवाड कार्याध्यक्ष,कॉम्रेड पांडुरंग वाघमारे उपाध्यक्ष, सर्वहारा जन आंदोलन नेते उपस्थित होते.

  कॉम्रेड कृष्णा भोयर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,स्मार्ट प्रीपेड मीटर हा केंद्र सरकारचा प्रकल्प असून तो महाराष्ट्रात राबवल्या जात आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून २ कोटी २५ लाख ६५ हजार वीज ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्यात येणार आहे.एका मीटरची किंमत रु.१२००० असून केंद्र सरकार रु.९०० अनुदान देत आहे. इतर सर्व पैसे एकतर महावितरण कंपनीच खर्च करावे लागेल किंवा वीज ग्राहकाकडून वसूल करावे लागेल. महाराष्ट्रातल्या प्रकल्पाचा एकूण खर्च रु.२७ हजार कोटी आहे.महावितरण कंपनी आर्थिक अडचणीत आहे.वीज ग्राहकाकडे एक लाख कोटीच्या वर थकबाकी आहे.ती वसूल होत नाही अशातच स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्याचा खर्चाची भर पडल्यानंतर महावितरण कंपनी आर्थिक डब्बायला येईल. महावितरण कंपनीने पायाभूत सुविधा निर्माण करण्याकरिता करोडो रुपयाचे कर्ज आहे. त्याची परतफेड करणे अजून बाकी आहे.अशातच स्मार्ट प्रीपेड मीटरचा खर्च वाढल्याने कंपनी अधिक तोट्यात जाईल. 

 महावितरणच्या राज्यभरातील वीज ग्राहकांना पायाभूत सुविधांची गरज असताना ती न करता, चांगले मीटर बदलून,स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्यात येत आहे.हे सर्व खाजगी भांडवलदारांना नफा कमवण्याकरिता करण्यात येत आहे.या धोरणास वर्कर्स फेडरेशन संघटनेचा विरोध आहे.वीज ग्राहकाने स्मार्ट प्रीपेड मीटर लावावे कि पोस्टपेड मीटर लावावे हा विद्युत कायदा २००३ व विद्युत अधिनियम २०२० कलम (४७) ५ अन्वने अधिकार दिलेला आहे.त्या अधिकाराचे महावितरण कंपनी उल्लंघन करत आहे.

    कॉम्रेड उल्काताई महाजन संबोधित करताना म्हणाल्या की,वीज ग्राहकाच्या अधिकाराचा हनन करून सरकार व महावितरण वीज कंपनी वीज ग्राहकांना बळजबरीने स्मार्ट प्रीपेड मीटर लावत आहे. हे आम्ही कदापि सहन करणार नाही.या विरोधात  रायगड जिल्ह्यातील वीज ग्राहकांना एकत्र करून मोठे जन आंदोलन उभे करू.या मेळाव्याने जनआंदोलनाची सुरुवात झाली असून हे आंदोलन शहर,गाव व खेड्यापर्यंत पोहचवून स्मार्ट प्रीपेड मीटरला विरोध करेल,या मीटरमुळे ग्राहकाचे काय नुकसान होणार आहे हे आम्ही प्रत्येक गावात समजावून सांगून ग्रामपंचायतीमार्फत महावितरण कंपनीचे निवेदन पाठवून स्मार्ट प्रीपेड मीटरचा विरोध करणार असेही त्या म्हणाल्या.

    याबाबत  रोहा कार्यकारी अभियंता प्रदीप दाळू रोहा यांना वीज ग्राहकाचे स्मार्ट प्रीपेड मीटर न बसविण्याचे निवेदन सर्वहारा जन आंदोलनाच्या शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन वतीने देण्यात आले.वीज ग्राहकाच्या परवानगीशिवाय स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्यात येऊ नये अशीही मागणी करण्यात आली.कार्यकारी अभियंता यांनी सांगितले की आपले निवेदन मी वरिष्ठ कार्यालय पाठवतो व आपल्या भावना लेखी स्वरूपात त्यांना कळवतो.मेळाव्याचे आयोजन सोपान सुतार, चंद्रकांत गायकवाड, पांडुरंग वाघमारे, श्रीमती चंदा तिवारी,उमेश ढुमणे,रघुनाथ नाईक, योगिता जाधव,धर्मा पिंगळा, यांनी केले होते.

Comments

Popular posts from this blog