उत्कृष्ट कामगिरी करणारे आरोग्य सेवक सुधीर खैरे यांचा रातवड ग्रामपंचायती कडून सन्मान!
माणगाव(प्रतिनिधी) शासनाच्या आरोग्य सेवेचा लाभ आदिवासी वाड्यावर पर्यंत गोरगरिबांपर्यंत मिळाव्या म्हणून सतत धडपडत असणाऱ्या व जनमानसात परिचित असणाऱ्या आरोग्य सेवक सुधीर गणपत खैरे यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित साधून रातवड ग्रामपंचायतीने आरोग्य सेवक सुधीर खैरे यांचा रायगड जिल्हा परिषद शाळा रातवड येथे शाल श्रीफळ व सन्मानपत्र देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
प्राथमिक आरोग्य केंद्र इंदापूर अंतर्गत आयुष्यमान आरोग्य मंदिर रातवड येथे श्री.सुधीर गणपत खैरे हे आरोग्य सेवक म्हणून सेवा करतात आरोग्य सेवक सुधीर खैरे यांनी रातवड येथील रातवड विभागात जनतेला उत्तम प्रकारे सेवा व चांगली वागणूक दिली. तसेच वेगवेगळ्या साथीच्या आजारामध्ये आदिवासी वाड्यांपर्यंत जाऊन प्रत्येक व्यक्तीपर्यंत सेवा देण्याचे कार्य केले. त्यांचा रातवड परिसरामध्ये प्रत्येक व्यक्तीपर्यंत नित्याचा संपर्क आहे. त्यांच्या गोड मनमिळाऊ स्वभावामुळे परिसरातील लोकांना त्यांनी आपलंसं केलं आहे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन रातवड ग्रामपंचायतीने त्यांचा स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून रातवड ग्रामपंचायतीने त्यांना शाल, श्रीफळ,व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सदर वेळी रातवड ग्रामपंचायतच्या सरपंच श्रीमती वैशालीताई पवार तसेच उपसरपंच सतीश पवार, तसेच ग्रामपंचायतीचे सदस्य सृष्टी जाधव, सीमा ऐत, बाळाराम वाघमारे, नीरा वाघमारे, संदेश गायकवाड तसेच माजी पी एस आय पोलीस अधिकारी श्री सुदेश पालकर साहेब तसेच माजी अपना बँकेचे मॅनेजर श्री शरद पालकर साहेब मुख्याध्यापक सुधीर निकम, मुख्याध्यापिका राशिलकर मॅडम शालेय समिती अध्यक्ष नितीन जंगम तसेच ग्रामपंचायत जलसुरक्षक शैलेश ऐत,तसेच जिल्हा परिषद दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक, अंगणवाडी ताई, सर्व आशाताई, तसेच पालक, ग्रामस्थ महिला मंडळ, आदिवासी बांधव व पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
आरोग्य सेवक सुधीर खैरे यांच्या कार्याची दखल घेऊन रातवड ग्रामपंचायतीने आरोग्य सेवक खैरे यांचा गुणगौरव केल्याने परिसरात सुधीर खैरे यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
Comments
Post a Comment