वाल्याकोळ्याचा वाल्मिक ऋषी करण्याची ताकद त्याच्या बायकोत होती म्हणून तो वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला:-प्रितमताई पाटील 

कोलाड (विश्वास निकम, रायगड भुषण) वाल्याकोळ्याचा वाल्मिक ऋषी करण्याची ताकद फक्त त्याच्या बायकोत होती कारण त्याच्या बायकोनी सांगितले कि मी तूझ्या पापात मी वाटेकरी होणार नाही.आजच्या महिला शाळेत गेलेल्या व नोकरीला गेलेल्या मुलीला बोलतात कि तु सातच्या आत घरी ये त्याच प्रमाणे जो मुलगा रात्री बारा वाजेपर्यंत बाहेर असतो त्याला का लवकर घरी ये असे बोलले जात नाही.त्याच्यावर ही चांगले संस्कार करणे गरजेचे आहे. रामायण व महाभारत ग्रंथ वाचण्यापुरते नाहीत त्याचा बोध घेणे गरजेचे आहे. ऐनघर पंचक्रोशी ग्रामीण युवा बेरोजगार संघटनेचे कार्य कौतुकास्पद असून त्यांनी राजमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने ऐनघर पंचक्रोशीतील व नागोठणे विभागातील बचत गटातील सर्व महिलांना एकत्र करून हा महोत्सव  साजरा केला जात आहे. तसेच शासन बचत गटाच्या माध्यमातून विविध योजना राबवित असते यासाठी माझ्याकडून महिलांना कोणतेही सहकार्य लागले त्यासाठी तुम्ही माझ्याकडे या मी माझ्याकडून जरूर सहकार्य करेन असे मत पेण नगरपरिषद अध्यक्षा प्रितमताई पाटील यांनी महिलांना मार्गदर्शन करतांना व्यक्त केले.

      यावेळी व्यासपीठावर सपनाताई खांडेकर (व्याख्यानकार संविभागी वारकरी विचार मंच रायगड ),सय्यद मुतूझा अहमद, महादेव मोहिते,ह.भ.प. शंकर मोहिते, नाना शिरसे, तानाजी लाड,यशवंत हळदे, राम तेलंगे, टिळक खाडे, रघुनाथ कडू,दगडू बामुगडे,वंदना म्हात्रे, वैशाली शेडगे, मनिषा मोहिते,वर्षाताई जांबेकर, अमृता खरिवले, दिपाली गोळे, हेमा डाकी,पुजा चोरगे,मानसी कणघरे, प्रिया ठमके,सुवर्णा सुटे, अपर्णा सुटे,रसिका गोळे,दर्शना शिंदे,प्रितम पाटीलअनिल लाड, परशुराम शिरसे, विजय शिरसे, रविंद्र यादव,काशिनाथ शिरसे, सयाजी शिंदे, महेश शिरसे, केशव तेलंगे, नारायण लाड,जितेंद्र धामणसे, मोहन हिलम, वाघसर,व ऐनघर पंचक्रोशीतील व नागोठणे विभागातील सर्व बचत गटाचे पदाधिकारी,व सदस्य उपस्थित होते.

  तसेच व्याख्यानकार सपना ताई खांडेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना माणसाने शब्द हे जपून वापरले पाहिजे कारण शब्द हे तळपत्या सूर्याला आकार देतात, शब्द भेगाललेल्या जमिनीला शार देतात, शब्द जीवनाच्या प्रवासात साद देतात शब्द मुक्याला हुंकार देतात, शब्द बोलणाऱ्या लेखनीला धार देतात म्हणून शब्द हे जपून वापरले पाहिजे.

जर राजमाता जिजाऊ नसत्या तर घडले नसते छत्रपती शिवराय, छावा,शंभूराजे व मावळे घडले नसते.यामुळे आपण हा सोहळा साजरा करू शकतो. त्यामुळे स्त्रि ही आपल्या मुलांना घडवू शकते आपल्या मुला-मुलींनी वाईट कृत्य केले तर आपल्या आईवडिलांचे नाव खराब होते.त्यामुळे मुलांवर चांगले संस्कार करावे.

       प्रस्तावना मध्ये ऐनघर बेरोजगार संघटनेचे अध्यक्ष दिनेश कातकरी यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले कि मराठी तरुणांना व आदिवासी तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी आमची संघटना कसोशीने प्रयत्न करीत आहोत यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा उद्योगकेंद्र,व इतर ठिकाणी तरुणांना रोजगार मिळण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे. या ठिकाणी म्हटलं जाते कि मराठी माणूस भांडखोर आहे.वादविवाद करीत असतात परंतु आम्ही कोणताही वादविवाद न करता कायद्याच्या मार्गाने प्रयत्न सुरु ठेवले आहेत.कंपनी बोलते कि आम्ही ७७२ कामगार कामावर घेतले परंतु असे कोठेही दिसत नाही आम्ही कायद्याची लढाई लढत असतांना आमचा वर्धापन दिन साजरा न करता आम्ही राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती साजरी करीत असतो.

यावेळी शालेय विद्यार्थीनी महिला वर्ग यांनी ही राजमाता जिजाऊ व सावित्रीमाई फुले यांच्या जयंती निमित्ताने मनोगत व्यक्त केले. सर्व कार्यक्रम यशश्विकरण्यासाठी ऐनघर पंचक्रोशी ग्रामीण युवा बेरोजगार संघटनेचे धर्मा शेठ, सतीश सुटे, प्रफुल कणघरे, विजय शिरसे,निलेश साळवी,नवनाथ बर्जे , मंगेश लाड, पप्या लाड, दत्तात्रेय तेलंगे, कृष्णा तेलंगे, विवेक हरपाल, चेतन मोहिते,रोशन मोहिते, राकेश मोहिते,नामदेव केदारी, राहुल हळदे, महेश गायकर,अतुल भिलारे, दिनेश कदम,सुनील ढाणे, सागर ढाणे, संदीप कणघरे, हेमंत शिरसे, निलेश बलकावडे, मोरे, रोहन तेलंगे, प्रकाश जंगम, पुंडलिक महाले, पांडू शेठ, दिनेश कातकरी,संतोष वाघमारे, दिलीप वाघमारे,व इतर सदस्य यांनी अथक परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog