द.ग.तटकरे माध्यमिक व उच्च माध्यमिक कोलाड १२ वी विज्ञान शाखेचा निकाल ९८.४८ टक्के
गोवे येथील ग्रामीण भागातून वाणिज्य (संयुक्त)शाखेतून कु.चैताली गणेश दहिंबेकर प्रथम
कु.चैताली गणेश दहिंबेकर |
गोवे -कोलाड (विश्वास निकम ) द.ग. तटकरे माध्यमिक व उच्च माध्यमिक कोलाड १२ वी. विज्ञान शाखेचा निकाल ९८.४८% लागला असून या परीक्षेत विज्ञान शाखेतुन कु.अश्मी किशोर पोळेकर ८६.१७% गुण मिळवून प्रथम, कु. समीक्षा चंद्रशेखर पाटील ८१% गुण मिळवून दुतीय, कु. हर्ष नरेश वारघडे ८०.८३%गुण मिळवून तृतीय, क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. वाणिज्य शाखेचा निकाल ९०.४७% लागला असून वाणिज्य (इंग्लिश ) मधून कु. गौरव संतोष यादव ८५.६६% गुण मिळवून प्रथम, कु. सई संजय शिंदे ८५.१६% गुण मिळवून दुतीय, कु. श्रेयस सदानंद गावडे ८४.५% गुण मिळवून तृतीय, तर वाणिज्य (संयुक्त ) मधून कु.चैताली गणेश दहिंबेकर ६७% गुण मिळवून प्रथम,तर कु. दिव्या चंद्रकांत बाईत ६२.६७% गुण मिळवून द्वितीय, तर कु. पायल गणपत भालेकर ६०.३3% गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.
तर कला शाखेचा निकाल २३.८०% लागला असून कला शाखेतून कु.नेहा विजय गुप्ता ६१.१६% गुण मिळवून प्रथम, प्रथमेश म. मेहता ६०.६६% गुण मिळवून द्वितीय, तर कु. वैशाली प. वरवटे ५३.१६% गुण मिळवून तृतीय, तर टेक्निकल शाखेचा निकाल ६७ % लागला असून टेक्निकल शाखेतून कु. भावेश कुंदाराम सरफळे ७१.५% गुण मिळवून प्रथम, तर कु.प्रितेश वसंत उमासरे ६९.८३% गुण मिळवून द्वितीय ,कु. हरिओम किसन वमासरे ६३.१६% गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले असून सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्याचे अभिनंदन मुख्याध्यापक शिरीष येरुणकर सर,उपमुख्यध्यापक व सर्व शिक्षक व सर्व कर्मचारी वृंद यांनी केले आहे.
गोवे सारख्या ग्रामीण भागात राहून वाणिज्य संयुक्त शाखेमधून प्रथम येण्याचा मान कुमारी चैताली गणेश दहीबेकर हिने मिळविला असून चैतालीचे गोवे परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Comments
Post a Comment