चि.सौ.का.दिपाली व चि.शुभम यांचा शुभविवाह प्रसंगी सौ. वरदाताई सुनील तटकरे व आमदार अनिकेत भाई तटकरे यांची सदिच्छा भेट!

सुतारवाडी ( प्रतिनिध)संपूर्ण रायगड जिल्ह्यात परिचित असणारे व रोहा तालुक्यातील सुतारवाडी येथील गोरगरीब, शोषित,वंचित उपेक्षित, व आदिवासी समाजाचे प्रश्न नेहमी वर्तमानपत्रांच्या माध्यमातून पोटतिडकीने निर्भीडपणे लेखणीतून मांडणारे सुतारवाडी येथील ज्येष्ठ पत्रकार श्री हरिश्चंद्र महाडिक यांची जेष्ठ कन्या चि.सौ.का दिपाली आणि श्री. सुनिल राऊत यांचे ज्येष्ठ चिरंजीव शुभम यांचा शुभविवाह नुकताच संपन्न झाला.

 वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी खासदार सुनिलजी तटकरे यांच्या पत्नी सौ. वरदाताई सुनील तटकरे आमदार अनिकेत भाई तटकरे उपस्थित होते तसेच रोहा तालुक्यातील असंख्य मान्यवर उपस्थित होते.


Comments

Popular posts from this blog