रोहा सिटीझन फोरम आयोजित नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद! 

१४१ रुग्णांनी केली तपासणी  ४३ जणांना शास्त्रकियेसाठी पनवेलला पाचारण, 

कोलाड (श्याम लोखंडे ) रोह्यातील सामाजिक संस्था रोहा तालुका सिटीझन फोरम ट्रस्ट (रजि.) आणि नविन पनवेल येथिल आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल यांच्या वतीने आयोजित केलेल्या मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात १४२ रुग्णांची तपासणी करण्यात आली तर ४३ जणांना मोतीबिंदू शास्त्रकियेसाठी नवीन पनवेल येथिल हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले. 


रोहा येथिल श्री धावीर देवस्थानाच्या प्रांगणात आयोजित या शिबिराच्या प्रारंभी काश्मिरमध्ये शहीद झालेल्या जवानांना उपस्थितांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी रोहा तालुका सिटीझंस फोरमचे अध्यक्ष नितीन परब, निमंत्रक आप्पा देशमुख, ज्येष्ठ पत्रकार दिलीप वडके, श्रीकांत ओक, अॅड मनोजकुमार शिंदे, महेश सरदार, राजेंद्र जाधव, संदीप सरफळे, इल्यास डबीर, निलेश शिर्के, अमोल देशमुख, सचिन शेडगे, प्रशांत देशमुख आदी उपस्थित होते. या शिबिरास माजी नगराध्यक्ष संजय कोनकर, समीर शेडगे, माजी उपनगराध्यक्ष अहमद दर्जी, उस्मान रोहेकर, ज्येष्ठ पत्रकार विजय देसाई, शैलेश रावकर, राजेश काफरे, परशुराम चव्हाण, भरत गुरव आदींसह तालुक्यातील अधिकारी वर्ग व रोह्यातली प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी व समाजसेवी संस्थानी सदिच्छा भेट दिली.

शिबिरामध्ये आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटलचे टीम मॅनेजर प्रकाश पाटील, डॉ. वामसी कृष्णा, फॅबिना फर्नांडिस, गायत्री चौरसिया, अंजू पाल, लवप्रीत कौर, नरेश आवलर यांनी तपासणी काम पाहिले, तर रोहा सिटीझन फोरमचे दिनेश जाधव, भावेश अग्रवाल, दिनेश मोहिते, समिधा अष्टीवकर यांच्यासह आशा सेविका संजिवनी संजय चाळके, मंथना प्रफुल्ल झुरे, सिमरन सदानंद कडव, नलिनी नंदकुमार सावंत, सुप्रिया दिपक बठारे, प्रज्ञा लहाने, दिप्ती गुडेकर आदींनी विशेष परिश्रम घेतले. शिबिराच्या आयोजनासाठी नविन पनवेल येथिल आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटलचे प्रकाश पाटील आणि त्यांच्या टीमने सहकार्य केले. या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने रोहा तालुका सिटीझन फोरमचे अध्यक्ष नितिन परब यांनी सहयोगी सेवाभावी संस्थांचे आणि शिबिरासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत.

Comments

Popular posts from this blog