रा.जि.प.शाळा वरवणे पेण येथे डिजिटल वर्गाचे शानदार उदघाटन!

पेण (प्रतिनिधी ) रा जि प शाळा वरवणे येथे डिजिटल वर्गाचे उदघाटन करण्यात आले,डिजिटल वर्गाचे उदघाटन मा. गटशिक्षणाधिकारी श्रीम अरुणदेवी मोरे, वरवणे ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ श्वेता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले इ लर्निंग किट प्रवीण मसालेवाले यांनी  प्रोजेक्टर ,स्क्रीन, अभ्यासक्रम असा पूर्ण सेट शाळेसाठी दिला . तर शाळेची डिजिटल रंगरंगोटी उद्योगपती श्री  राजू पिचिका  यांनी केली

 तसेच लोकवर्गणीतून कार्यक्रमाचा खर्च करण्यात आला माजी विद्यार्थी रुपेश दळवी , प्रवीण भरम ,यांनी शाळेला 10 नेत्यांचे फोटो फ्रेम उदघाटनाच्या या प्रसंगी भेट दिले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री खंडू येरणकर होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज ठाकूर सर यांनी केले व प्रास्ताविक शिक्षणप्रेमी आद श्री संदीप तोंडीलकर यांनी केले श्री संदीप तोंडीलकर यांनी असे शिक्षक सगळ्या शाळेत असतील तर शाळेचा विकास 100% होईल तसेच शाळेतील शिक्षिका सौ ज्योती अवघडे व हेमांगी मानकवळे यांचे कौतुक करीत त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे कौतुक केले.

 पालकांनी आपले पाल्य या शाळेतच टाकले तर ही मुले चुणचुणीत व हुशार होतील असे सांगत शिक्षकांचे कौतुक केले, गटशिक्षणाधिकारी श्रीम मोरे मॅडम यांनी शाळा 100% डिजिटल झाल्या पाहिजेत असे सांगत दोन्ही शिक्षकांचं कौतुक केलं.  कार्यक्रमाच्या या प्रसंगी इनर्व्हील क्लब अध्यक्षा सौ सुनंदा गावंड, रोटरी अध्यक्ष श्री शिगवण ,श्री आपटे व गणेश जोशी, उपसरपंच श्री इंदुलकर , कामारली केंद्राचे केंद्रप्रमुख श्री गणेश कोळी व शिक्षक वृंद उपस्थित होते  खजिनदार तन्वी हजारे ,नम्रता ढवळे, शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षा अमृता पाटील मीना पाटील , शाळेच्या शिक्षिका हेमांगी मानकवळे यांनी उपस्थितांचे आभार मानले ,शाळेतील मुख्याध्यापिका सौ ज्योती अवघडे या विविध पुरस्कारांनी सन्मानित आहेत या आधी पण त्यांनी गौळणवाडी शाळा डिजिटल करून 100% उपस्थिती व प्रगत शाळा केली आहे.


Comments

Popular posts from this blog