येरळ ग्रामपंचायत हद्दीतील विविध विकास कामांचे भूमिपुजन व उद्‌घाटन खासदार सुनिल तटकरे, पालकमंत्री कु.आदिती तटकरे,आमदार अनिकेत तटकरे यांची उपस्थिती

सुतारवाडी :(हरिश्चंद्र महाडिक)अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर येरळ ग्रामपंचायत हद्दीतील विविध विकास कामांचे भूमिपूजन उद्घाटन समारंभ खासदार सुनिल तटकरे, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु. आदितीताई तटकरे, आमदार अनिकेत भाई तटकरे यांच्या हस्ते आणि रोहा पंचायत समितीचे माजी सभापती मोतीराम तेलंगे, येरळ सरपंच सौ. विमल दळवी, उपसरपंच सौ. संध्या मोरे, श्री. बाबुराव बामणे, श्री. वसंत मरवडे, श्री. महेंद्र पोटफोडे, श्री. चिंतामण दळवी, श्री. सूर्यकांत दळवी, श्री. नरेंद्र जाधव, रोहा तहसिलदार कविता जाधव, सुप्रिया जाधव, जगन्नाथ धनावडे, राकेश शिंदे, प्रितम पाटील तसेच जामगाव सरपंच, कुडली सरपंच, दत्ताराम मंचेकर, दयाराम महाडिक, प्रकाश सुंदरराव मोरे, मनोहर साळवी, विजय सावंत, विजय कामथेकर, संजय मांडलुसकर, सुतारवाडी ग्रामस्थ, तसेच येरळ कुडली ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी द. ग. तटकरे माध्यमिक विद्यालय सुतारवाडी हायस्कूलच्या संरक्षक भिंती चे उद्घाटन, सुतारवाडी येथील अंतर्गत रस्त्यांचे उद्घाटन, सावरवाडी रस्त्याचे उद्घाटन, मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे उद्घाटन, सुतारवाडी रस्ता उद्घाटन, स्मशानभुमी निवारा शेड चे भूमिपूजन, स्वागत कमान लोकार्पण मंदिर संरक्षक भिंत उद्‌घाटन, पथदिवे उद्घाटन सोहळा अशा विविध लोकोपयोगी विकास कामांचे उद्घाटन व भूमिपुजन समारंभ प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत संपन्न झाला.

                   सुरुवातीला उपस्थित मान्यवरांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सुत्रसंचलन संदिप साळवी  यांनी केले. विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन झाल्यानंतर सुतारवाडी येथे जाहिर सभा घेण्यात आली. या सभेस पंचक्रोशितील ग्रामस्थांसह महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता.

             विधान परिषद सदस्य आमदार अनिकेत तटकरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले गेल्या अनेक वर्षापासून तटकरे कुटुंबिय विकास काम करत आहेत.  ते पुढे म्हणाले आज तगायत विकास कामात आम्ही कधीही कमी पडलो नाहीत. सुनिल तटकरे साहेबांच्या खासदार निधितून येरळ रस्त्यासाठी पंचवीस लाख रुपये टाकून रस्ता सुस्थितीत झाला. तसेच स्ट्रीट लाईट ढोकलेवाडीसाठी व्यायाम शाळा, रस्ता नळपाणी योजना एवढेच नाही तर येरळ ग्रामपंचायती मार्फत विविध विकास कामांसाठी दोन ते अडीच कोटींचा निधी मंजूर करून आणला. जाधववाडी, पाथरशेत, येथील रस्ते तसेच जामगाव येथील अंतर्गत रस्ते  त्याचप्रमाणे जामगाव ग्रामपंचायतीला ७० लाख रु निधी उपलब्ध करुन दिला असून धगडवाडी, अंबिवली येथील रस्ते त्याचप्रमाणे धगडवाडी साठी पाणी पुरवठा योजना मंजुरीसाठी पाठविली असून ती लवकरच येणार असल्याचे आमदार अनिकेत तटकरे यांनी सांगितले. यावेळी क्रिकेट प्रेमी खेळाडूंनी अनिकेत भाईंचा सन्मान चिन्ह देऊन खास सत्कार केला.

      खासदार मा. सुनिल तटकरे यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले गेल्या तीस पस्तीस वर्षात आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने मंत्रीमंडळातील अनेक महत्वाची पद भी यशस्वीपणे पार पाडली. आज पर्यंत मी देशाच्या राज्याच्या कोठेही असलो तरी येथील गोविंदा दसरा आणि होळी सणासाठी न चुकता येत असतो. पूर्वी या ठिकाणी छोटे खणी शाळा भरायची आता वसंतराव ओसवाल यांनी मोठी इमारत बांधली असून अनेक वाड्यांतील विद्यार्थी ज्ञानाजर्नाचे कार्य करत आहेत. दुरटोली येथे प्राचीन मंदिर आहे. त्याचे सुशोभीकरण आणि परमेश्वरांच्या नवीन मूर्ती 

बसविल्या गेल्या असून यासाठी रु. साठ लाख खर्च आला आहे. या मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. या ठिकाणी अनेक पर्यटन स्थळ झाली असून एक लाखापेक्षा अधिक पर्यटक भेटी देत असतात. रोह्यात २२ कोटी रुपयांचे नाट्यगृह उभारण्यात येणार आहे. तसेच सुतारवाडी परिसरामध्ये भव्य प्रमाणात वनऔषधी उद्यानाची लवकरच निर्मिती होणार गेल्या दोन ते तीन वर्षात हे काम पूर्ण होईल या परिसराचे चित्र बदलण्याची ताकद आम्हाला तुमच्यामुळे मिळाली असून सुतारवाडीत एक खासदार आणि दोन आमदार आहेत. तटकरे कुटूंबार मा. शरद पवार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे आदिंचे जिव्हाळ्याचे संबंध असल्यामुळे ते कधी विकास कामांच्या उद्‌घाटनासाठी आले की सुतारवाडीत हक्काने येतात. या परिसरातील महिलांनी घरगुती वस्तू तयार करून आपल्या कुटुंबासाठी जास्तीत जास्त आर्थिक बळ निर्माण करावे. तरुण पिढीला जास्तीत जास्त काम कसे मिळेल याकडे आमचे लक्ष केंद्रित असेल. येथील पंचक्रोशीमध्ये असलेल्या मंदिरांसाठी जेवढा निधी देता येईल तेवढा आम्ही दिला. हा संपूर्ण परिसर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी विरोधी पक्षाचा बुथ सुद्धा लागणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. तरुणांनी जिद्द, चिकाटी आणि संयम ठेवणे आवश्यक असून तरुणांना रोजगाराची संधी कशी उपलब्ध होईल हे पाहिले जाईल असे शेवटी सांगितले.

        सुतारवाडी येथील संरक्षण भितीच्या उद्‌घाटन प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. काळेसर, सु.ए.सो.चे सचिव रविकांत घोसाळकर, प्राचार्य पालवे सर उपस्थित होते.

पोलीस पाटील संतोष दळवी यांच्यासह सुतारवाडी, दुरटोली, येरळ, सावरवाडी, जामगाव, कुडली, ढोकलेवाडी, गौळवाडी, कामथ, कोलाड, खांब परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Comments

Popular posts from this blog