आमडोशी गावचे केशव अण्णा भोसले यांचे निधन
कोलाड नाका (शरद जाधव) रोहा तालुक्यातील आमडोशी गावचे ह.भ. प. केशव नारायण भोसले उर्फ अण्णा यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी ते 82 वर्षाचे होते.
केशवअण्णा भोसले हे सामाजिक राजकिय, क्षेत्रात सहभागी असायचे. वारकरी असल्याने अध्यात्मिकतेचि फार आवड होती.ते वारकरी पायी दिंडीचे कार्यवाहक वांगणी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच होते.ते गावातील अखंड हरिनाम सप्ताहात. हरिपाठ,भजन, यामधे नेहमी सहभागी असायचे. त्यांच्या निधनाने एक आधारवड हरपल्याने भोसले कुटुंबियांचे नुकसान झाले आहे. त्यानी शेती कामात खुप मेहनत घेतली. गवंडी काम देखील ते करायचे त्यामूळे अतिशय काबाड कष्ट करणारे असे व्यक्तीमत्व होते.
गावातील सामाजिक राजकिय कार्यकर्ते प्रमोद भोसले यांचे ते चुलते होते. तर प्रमोद जांभेकर यांचे ते आप्त नातेवाईक तसेच. कब्बडी पटू जयेश ज्ञानेश्वर भोसले यांचे ते आजोबा होते. गोवे.पुगाव. भिसे. वरसगांव.कुहिरे.कडसुरे या ठिकानी त्यांचे सगे सोयरे नातेवाईक आहेत. गेली 12 दिवस त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी याकरिता हरिपाठ व भजन वारकरी मंडळ करित आहेत.
त्यांचे उत्तरकार्य बुधवार दिनांक 4 एप्रिल रोजी राहत्या घरी आमडोशी येथे होणार आहेत. पच्यात एक मुलगा एक मुलगी सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Comments
Post a Comment