डोंबिवली येथे राज्यस्तरीय लिंगायत वधू- वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन

 गोवे-कोलाड (विश्वास निकम )वीरशैव लिंगायत समाजातील सर्व पोटातील इच्छुक वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन ८ मे रोजी सर्वेश मंगल कार्यालय , ताई पिंगळे चौक डोबिंवली( पूर्व ) येथे महाराष्ट्र वीरशैव सभा ठाणे जिल्हा समिती व वीरशैव लिंगायत सेवा संस्था ठाणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे.

        ठाणे विभागाचा हा राज्यस्तरीय ३२ वे वधू- वर मेळावा असून इच्छुकांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन समिती उपाध्याक्ष श्री बसवंतराय अळ्ळगी यांनी केली आहे.हा मेळावा सकाळी १० वाजता सुरू होणार असून या मेळाव्यास अंबरनाथ नगराध्यक्ष सौ.मनिषा अरविंद वाळेकर,अनंत हलवाई प्रा.ली.संचालक राजूशेठ विठ्ठल गवळी, अध्यक्ष शांतकुमार लच्याने, कार्याध्यक्ष प्रदिप निलाखे, सरचिटणीस सिध्देश्वर लिगाडे, सल्लागार चंद्रकांत मनियाळ उपाध्यक्ष बी.डी.अळ्ळगी,शिवानंद सकपाळ,श्रीमती प्रमिला वि लंबे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी डोंबिवली श्री दादा पाटील,ठाणे सौ.राजश्री मेणकुदळे यांच्याशी संपर्क साधण्याचा आवाहान आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog