सुतारवाडी नाक्यावर वाघमारे गुळाचा चहा

 गुळाच्या चहाला सर्वाधिक पसंती! 

सुतारवाडी (हरिश्चंद्र महाडिक)सुतारवाडी नाक्यावर असलेल्या श्री. रमेश डेकाटे आणि सौ. वैशाली डेकाटे यांच्या मालकीच्या 'आरेवा' मॉल च्या गाळ्यामध्ये वाघमारे गुळाचा चहा आणि आरेवा स्नॅक सेंटर से नुकतेच उद्‌घाटन करण्यात आले. आरोग्यदायी असलेल्या वाघमारे गुळाच्या चहाची चव अनेक उपस्थित मान्यवरांनी घेवून समाधान व्यक्त केले. 

                    यावेळी आरेवा स्नॅक्स सेंटरचे उद्‌घाटन ही करण्यात आले. आरेवा मॉलचे श्री. रमेश डेकाटे आणि सौ. वैशाली डेकाटे यांनी सांगितले सध्या साखरेच्या चहामुळे अनेकांना शुगर वाढल्याचा त्रास होतो. मात्र वाघमारे गुळाच्या चहाने कोणताही त्रास न होता हा चहा आरोग्यदायी असून त्याचे अनेक फायदे आहेत.

 तसेच आरेवा स्नॅक सेंटर मध्ये मिळणारे पदार्थ हे स्वच्छ व रुचकर असेच असणार असून वडापाव, भजी, मिसळ, थंडपाणी, ब्रेड बटर जाम, रस्सावडा, पिझ्झा, कोल्डड्रिंक्स, आईस्क्रीम असे विविध पदार्थ या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत.

                  लवकरच या आरेवा मॉल मध्ये कॅम्युटर प्रशिक्षण तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी शिकवणी वर्ग सुरु करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आरेवा मॉल मुळे सुतारवाडी नाक्यावरील सौंदर्यात अधिक भर पडली असून बाहेरून येणाऱ्या तसेच स्थानिकांसाठी एक पर्वणीच आहे.

Comments

Popular posts from this blog