अल्पवयीन मुलीच्या छेड प्रकरणी
विनोद साळवी यास तीन वर्षे सक्तमजूरी व दहा हजार रुपये दंड
अभियोक्ता ॲड. योगेश तेंडुलकर यांचेअभ्यास पूर्ण उच्च न्यायालयाची दाखले व उत्तम युक्तिवादाची होतआहे सर्वत्र प्रशंसा!
रायगड (भिवा पवार ) म्हसळा तालुक्यातील मौजे मांदाटणे गावातील फिर्यादी मुलगी अल्पवयीन म्हणजे अवघी 7 वर्षाची असताना आरोपी विनोद साळवी याने 23 जुलै2020 रोजी फिर्यादीच्या घरी दुपारी मुलगी अल्पवयीन आहे हेमाहिती असूनही तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून तिची छेड काढली.
आरोपी विरुद्ध हा खटला माणगाव सत्र न्यायालयात चालू होता.सत्र न्यायालयाने आरोपीवरील आरोप सिद्ध झाल्याने आरोपी विनोद साळवी यास 3 वर्षे सक्तमजूरी व दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.
माणगाव सत्र न्यायालयात फिर्यादीची बाजू सरकारी पक्षाच्या वतीनं अभियोक्ता ऑ.योगेश तेंडुलकर यांनी उच्चन्यायालयाच्या निर्णयाचे दाखले देतअभ्यासूपणे उत्तम प्रकारे युक्तीवाद केल्याने फिर्यादीस खऱ्या अर्थाने न्याय मिळवून दिला आहे. अभियोक्ता श्री.योगेश तेंडुलकर हे नेहमीच अन्यायकारक पिडीत महिला ,मुलींच्या बाजूने न्यायालयात लढत असतात. गरीबांना न्याय मिळवून देण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. असा त्यांचा लौकिक आहे .
सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश प्रिया बंदरकर यांनी ही शिक्षा सुनावली आहे.या कामी पोलीस आधिकारी उदय धुमसकर,छाया कोपनर ,,पोलीस हवालदार शशिकांत गोविलकळ ,सुनील कोळी,शशिकांत कासार ,सोमनाथ ढाकणे यांनी सरकार पक्षाच्यावतीने साक्ष दिली होती.
Comments
Post a Comment