तळा नगराध्यक्षा पदी अस्मिता चंद्रकांत भोरावकर

     तर चंद्रकांत रोडे यांची उप नगराध्यक्षपदी एकमताने निवड!

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात आनंदाचे वातावरण,

तळा /कृष्णाभोसले तळा नगर पंचायत निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अस्मिता चंद्रकांत भोरावकर यांची नगराध्यक्षपदी तर चंद्रकांत रोडे यांची उपनगराध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे.

     राष्ट्रवादी काँग्रेसचे १० नगरसेवक निवडून आल्याने तळा नगरपंचायत शिवसेनेच्या हातातुन निसटुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आली.राष्ट्वादी कॉंग्रेसचे खंदे समर्थक खा. सुनिल तटकरे यांचे निष्ठावंत कार्यकर्त कुणबी समाजाचे माजी तालुकाध्यक्ष चंद्रकांत भोरावकर यांच्या पत्नी अस्मिता भोरावकर यांचा नगराध्यक्ष पदासाठी तर चंद्रकांत रोडे यांचा उपनगराध्यक्ष पदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्याने अत्यंत संयमी, शांतता राखुन ही निवडणूकपार पडली.


   यावेळी विधान परिषद आमदार अनिकेत तटकरे, जि.प.सदस्य बबन चाचले, सभापती अक्षरा कदम,माजी जिल्हा परिषद सदस्य जेष्ठ नेते मंगेशशेठ देशमुख,युवा नेते राकेश नांदगावकर, महेन्द्रशेठ कजबजे,युवा तालूका अध्यक्ष नागेश लोखंडे, शहरातील तमाम राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित राहुन त्यांना शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog