श्री गणेश गोवे आयोजित क्रिकेट सामन्यात सोमजाई गोवे संघ विजेता

 गोवे-कोलाड (विश्वास निकम )गोवे-खांब ग्रामिण क्रिकेट असोसिएशन च्या मान्यतेने श्री गणेश गोवे आयोजित क्रिकेट सामन्यात श्री सोमजाई गोवे संघ अंतिम विजेता ठरला.सोमजाई गोवे व हेटवणे यांच्यात झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात अखेर श्री सोमजाई संघाने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला तर जय बजरंग हेटवणे संघाला द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. श्री क्षेत्रपाल पुई संघ तृतीय तर श्री सोमजाई तिसे संघ चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला.उत्कृष्ट सामनावीर सोमजाई गोवे संघाचा निखिल वाफिलकर तर स्पर्धेतील उकृष्ट गोलंदाज हेटवणे संघाचा अक्षय तेलंगे तर उत्कृष्ट फलंदाज म्हणून गोवे संघाचा सागर जाधव यांना प्रमुख पाहुण्याच्या शुभहस्ते गौरविण्यात आले .

       श्री गणेश गोवे यांच्या वतीने रविवार दि.३० जानेवारी रोजी आयोजित केलेली स्पर्धा निसर्गरम्य महिसदरा पात्राच्या किनाऱ्यावरील श्रीमती गीताताई द.तटकरे पॉलिटेक्निकल कॉलेजच्या प्रांगणात भव्य दिव्य असे क्रिकेट सामन्याचे उद्घाटन आंबेवाडी जिल्हा परिषद गटाचे विभागीय अध्यक्ष नरेंद्र जाधव,क्रीडाप्रेमी तथा जेष्ठ नागरिक रामा गुजर, गोवे खांब ग्रामिण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष प्रविण धामणसे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

             उत्स्फुर्तपणे प्रतिसाद लाभलेल्या सदरच्या श्री गणेश गोवे मित्र मंडळाने आयोजित केलेल्या स्पर्धेला व क्रिकेट खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी गोवे ग्राम पंचायतीचे उपसरपंच नितीन जाधव,पांडुरंग जाधव,लिलाधर दहिंबेकर,जयशिंग पवार,नंदकुमार वाफिलकर,रविंद्र जाधव,श्रीधर गुजर,महेंद्र जाधव,महादेव जाधव,नितीन वारकर,सुरेश जाधव,अरुण दहिंबेकर,आप्पा जाधव,अरुण पवार,शिवराम जाधव,रुपेश जाधव,अविनाश आंबेकर,धनेश घरट,बारक्या सुर्वे,उपस्थित होते.

तसेच कार्यक्रम यशस्विकरण्यासाठी श्री गणेश मंडळाचे हरिचंद्र गुजर,अजित दहिंबेकर,प्रशांत गुजर,निखिल दहिंबेकर,निलेश दहिंबेकर,अविनाश दहिंबेकर,अशोक दहिंबेकर,विनय दहिंबेकर,सार्थक दहिंबेकर,रुपेश पवार, शरद वारकर,सहेंद्र पवार, सत्कार कापसे, सुजित पवार, प्रल्हाद कापसे, मयूर जाधव, हर्षद जाधव, आकाश दहिंबेकर,राकेश मांजरे,साहिल दहिंबेकर,प्रमोद वारकर, पदाधिकारी युवक व सर्व सदस्य यांनी अथक परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog