द्वारकामाई मित्रमंडळ भुनेश्वर यांच्या तर्फे रोहा ते शिर्डी पायी दिंडी सोहळा,

  मेढा (राजेंद्र जाधव)रोहा शहरातील द्वारकामाई मित्र मंडळ भुनेश्वर यांच्या तर्फे रोहा ते शिर्डी पायी दिंडी सोहळा रविवार दि.९ जानेवारी २०२२ रोजी आयोजित करण्यात आला असून या पायी दिंडी सोहळ्याला भुनेश्वर रोहा येथून श्रीफळ फोडून सुरुवात करण्यात आली आहे.

               गेल्या वर्षा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आला होता याचबरोबर सर्वत्र देवदेवतांची मंदिरे बंद करण्यात आली होती.या बरोबर पायी दिंडी सोहळे ही बंद करण्यात आले होते.त्यानंतर कोरोना नियंत्रणात आल्यावर चार महिन्यापूर्वी सर्वत्र बंदी उठवण्यात आली.भाविकांसाठी मंदिरे खुली करण्यात आली.

     परंतु गेली आठ दिवसापासून पुन्हा एकदा कोरोनाच्या संख्येत दरदिवशी दुप्पटीने वाढ होतांना दिसत असून पुन्हा एकदा कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात येण्याचे संकेत मिळत आहे.असे असले तरी भक्तांच्या मनात श्रद्धा असेल तर पुढे काही निर्णय झाले तरी आम्ही साई दर्शनासाठी पायी शिर्डीला जाणार असाच भक्तांनी जणू चंग बांधला असून द्वारकामाई मित्रमंडळ भुनेश्वर यांच्या दिंडीला रविवार दि.९ जाने २०२२ रोजी प्रारंभ झाला असून या दिंडीचा शनिवार दि.१५ जानेवारी रोजी परतीचा प्रवास आहे असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog