लोणेरे येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उमाजी ढेपे यांचे अल्पशा आजाराने निधन,

कै. उमाजी ढेपे

माणगाव(प्रतिनिधी)एम.एस.ई.बी.मधून वरिष्ठ लेखनिक म्हणून निवृत्त, लोणेरे येथील रहिवासी उमाजी ढेपे यांचे वयाच्या 72 व्या वर्षी अल्पशा आजाराने शनिवार दिनांक 1 जानेवारी रोजी निधन झाले.

एमएसईबी मधून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी अनेक सामाजिक कामात हिरीरीने सहभाग घेतला होता.रा.स्व.संघाचे म्हसळा तालुका कार्यवाह म्हणून त्यांनी काम पाहिले होते.द्वितीय वर्ष  शिक्षित असणारे उमाजी ढेपे भारतीय मजदुर संघ कार्यकर्ता होते. त्यांच्या पश्चात पत्नी ,2 मुले,2 मुली आहेत. 

 सोमवार दिनांक 10 जानेवारी रोजी दशपिंड व मंगळवार दिनांक 11 जानेवारी रोजी श्राद्ध राहत्यां घरी लोणेरे येथे होणार आहेत. माहिती अधिकारा अंतर्गत अनेक प्रकारची माहिती उपलब्ध करून सामाजिक कार्यात सहभाग होता. विशेष करुन महसूल विभागाचा त्यांचा गाढा अभ्यास होता.  अनेक प्रकारचा भ्रस्टाचार त्यांनी उघडकीस आणला व सर्वसामान्य नागरिकांना त्यांनी न्याय मिळवून दिला .

त्यांच्या निधनाने सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली असून कै.उमाजी ढेपे यांच्या निधनाने माणगाव तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. 


Comments

Popular posts from this blog