लायन्स क्लब ऑफ कोलाड रोहाच्या वतीने भिवंडी येथील शाळांना प्रथमोपचार आरोग्य किटचे वाटप

खांब(नंदकुमार कळमकर)लायन्सक्लब ऑफ कोलाड रोहा यांच्या वतीने व सामाजिक बांधीलकीतून भिवंडी येथील पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ, संस्था भिवंडी संचालित शाळांना या क्लबच्या वतीने प्राथमिक प्रथमोपचार आरोग्य किटचे वाटप करण्यात आले. प्रसंगी यावेळी पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भिवंडी ,विद्याश्रम मराठी शाळा भिवंडी,शेठ सुकलाल पोद्दार इंग्लिश मीडियम स्कूल भिवंडी,व विद्याश्रम वसतिगृह भिवंडी ,या शाळांना लायन्सक्लब ऑफ कोलाड रोहा च्या सहकार्याने लायन्सक्लब चे अध्यक्ष डॉ सागर सानप यांच्या शुभहस्ते या प्राथमिक उपचार किटचे वाटप करण्यात आले. 

लायन्सक्लब ऑफ कोलाड रोहाच्या या सामाजिक उपक्रमाबद्दल विद्यालयाच्या वतीने संस्थेचे पदाधिकारी डॉ.सागर सानप सर ( अध्यक्ष-कोलाड रोहा लायन्स क्लब व सहाय्यक प्रोफेसर रसायन शास्त्र विभाग , बी. एन. एन. कॉलेज भिवंडी ) डॉ. श्रीमती कल्पना पाटणकर जैन मॅडम (व्हॉ.प्रिन्सिपाल बी.एन.एन.कॉलेज भिवंडी) प्राध्यापक निनाद जाधव सर (सहाय्यक प्रोफेसर ग्रामीण विकास विभाग , बी. एन. एन. कॉलेज भिवंडी ) व डॉ.रमेश घोगरे सर ( सहाय्यक प्रोफेसर रसायन शास्त्र विभाग , बी. एन. एन. कॉलेज भिवंडी) यांचे प्रसंगी लायन्सक्लब कोलाड व विद्यालयाच्या वतीने यावेळी स्वागत करण्यात आले तसेच उपस्थित मान्यवर पदाधिकारी यांनी विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या या मदतीबद्दल पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,भिवंडी. विद्यालयाचे - प्राचार्य जी.ओ.माळी सर,विद्याश्रम मराठी शाळा, भिवंडी ,प्राचार्या, सौ.विजया आर.मोरे मॅडम शेठ सुकलाल पोद्दार इंग्लिश मीडियम स्कूल,भिवंडी-प्राचार्य.महिपती कुलकर्णी सर विद्याश्रम वसतिगृह,भिवंडी-विलास आर.पवार सर वसतिगृह व्यवस्थापक,या सर्व संस्था संचालित शाळा व्यवस्थापन शिक्षक वर्गाकडून लायन्सक्लब ऑफ कोलाड रोहा यांचे आभार व कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

Comments

Popular posts from this blog