सुतारवाडी येथे 'अरेवा मॉलचे खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन

     सुतारवाडी (हरिश्चंद्र महाडिक) सुतारवाडी येथे नवीन शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये "अरेवा मॉलचे उद्घाटन खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री नामदार आदितीताई तटकरे, सौ. वरदा सुनिल तटकरे, गायक संतोष चौधरी ( दादूस ), येरळ ग्रामपंचायत सरपंच सौ. विमल दळवी, जामगाव सरपंच सौ. दर्शना म्हशिलकर, कुडली सरपंच सौ. अश्विनी कामथेकर, ग्राम पंचायत सदस्या सौ. संध्या मोरे, पोलिस पाटील श्री. संतोष दळवी, उद्योजक मंगेशशेट सरफळे आदि व्यासपिठावर उपस्थित होते. 

                " अरेवा मॉलच्या उद्‌घाटन प्रसंगी खासदार सुनिल तटकरे यांनी सांगितले नव्या वर्षाच्या सुरुवातीला येथील मॉलचे उद्‌घाटन होत आहे ही आनंदाची बाब आहे. या ठिकाणी अतिशय धाडसानं श्री. रमेश डेकाटे यांनी येथे मॉल सुरु केला. या परिसरामध्ये वेगवेगळे व्यवसाय वाढत असून रोजगार ही उपलब्ध होत आहेत. कै. दत्ताजीराव तटकरे आणि स्वातंत्र्य सैनिक कै. बापूसाहेब रसाळ या दोन विभूतींचे सामाजिक कार्य मोठे आहे. येथून जाणाऱ्या रस्त्याची आखणी दत्ताजीराव तटकरे यांनी केली. आज सुतारवाडी नाक्यावर येत असताना गेल्या पन्नास पंचावन्न वर्षा पूर्वीचा दिवस मला आठवला. काशिराम सुतार यांचा छोटासा हॉटेल आणि यशवंत तटकरे यांची पिठाची गिरण तसेच छोटेसे ग्रामपंचायत कार्यालय होते. त्यावेळी सुतारवाडीत पाच पंधरा घर होती. आजच्या तरुण पिढीला हा इतिहास माहित नाही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बदल झालेला आहे. कोलाड पेक्षा जास्त गर्दी माझ्या सुतारवाडी नाक्यावर होत आहे. या परिसरात अनेक फार्म हाऊस आहेत. या ठिकाणी निसर्गरम्य वातावरण असून कोठेही प्रदुषण नाही त्यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणावर येत असतात. या ठिकाणी एस.टी. निवारा शेड उभारल्यामुळे नाक्यावरचा चेहरा बदलेला असून आनंददायी वातावरण दिसत आहे. मार्तंड व्यायाम शाळा तसेच दुरटोली येथील शिवमंदिराचे सुशोभिकरण या गोष्टी पूर्णत्वास आल्या असून येथील मॉल मुंबई पुण्यासारखा होईल अशी सदिच्छा खासदार सुनिल तटकरे यांनी व्यक्त केली. या प्रसंगी प्रसिद्ध गायक संतोष चौधरी उर्फ दादूस यांनी बहरदार कोळी गीत गाऊन पंचक्रोशितील जनतेची मन जिंकली. त्यानंतर सौ. वरदाताई सुनिल तटकरे यांच्या समवेत हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी पंचकोशितील महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या. या कार्यक्रमास विविध ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी तोंडाला मास्क लावलेला होता. शासनाचे नियम पाळून कार्यक्रम दिमाखदारपणे संपन्न झाला. या कार्यक्रमास पावसानेही हजेरी लावली. 


Comments

Popular posts from this blog