कै.प्रदीप सावंत मित्र मंडळ आयोजित नाईट क्रिकेट स्पर्धेत जयभवानी चिंचवली संघ विजेता

. गोवे-कोलाड (विश्वास निकम )कै. प्रदीप सावंत मित्र मंडळाने आयोजित केलेल्या नाईट क्रिकेट स्पर्धेत जय भवानी चिंचवली संघाने अटीतटीच्या लढतीत स्वराज ग्रुप आंबेवाडी संघावर विजय संपादन करुन पुन्हा एकदा सलग दुसऱ्यांदा फिरता चषकावर नाव कोरून प्रथम क्रमांक पटकवला.

तर द्वितीय क्रमांक स्वराज्य ग्रुप आंबेवाडी नाका, तृतीय क्रमांक जय भवानी रोहा रोड,चतुर्थ क्रमांक जय बजरंग हेटवणे,या संघानी पटकाला.तर मॅन ऑफ द सिरीज सूर्यकांत येरुणकर,उत्कृष्ठ फलंदाज राणे,उत्कृष्ठ फलंदाज, श्रीनंद भिलारे, यांना देण्यात आले.यावेळी राकेश शिंदे,गणेश वाचकवडे,अलिम नुराजी,राहुल शिंदे,महेंद्र वाचकवडे सुधीर येरुणकर, सुभाष भोसले,आदी मान्यवर होते.

Comments

Popular posts from this blog