उप वनसंरक्षक रायगड कार्यालयासमोर आदिवासी बांधवांचे आमरण उपोषण
रायगड जिल्ह्यातील १६० आदिवासी वाड्या वन विभागाच्या हलगर्जीपणामुळे रस्ता वीज पाणी यासारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षी देशाचा मूळ मालक आदिवासींना हक्कासाठी उपोषण करावे लागते यासारखे दुर्दैव काय?
रायगड (श्याम लोखंडे)आदिवासी हा या देशाचा या भूमीचा मूळ मालक, मात्र या देशाच्या मूळ मालकालाच आपल्या हक्कांसाठी, आपल्या अस्तित्वासाठी, आपल्या हक्कासाठी स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्षात उपोषण करावे लागत आहे यासारखे दुर्दैव काय? शासन देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा जरी करत असले तरीही अजून गाव खेड्यांची, आदिवासी पाड्यांचे वर्तमान अत्यंत बकाल झाले आहे. शाळा, वीज, पाणी, रस्ते, आरोग्य यासारख्या किमान सुविधांचा आदिवासी समाजाला परीसस्पर्शही काही ठिकाणी झालेला नाही याचेच उत्तम उदाहरण म्हणजे रायगड जिल्ह्यातील पनवेल आपटा येथील आदिवासींचे उपोषण जिल्ह्याचे उप वनसंरक्षक आशिष ठाकरे यांच्या कार्यालयासमोर आदिवासी बांधवांना नागरी सुविधांचा अभाव त्यामुळे आमरण उपोषण सुरू झाले असून त्यांना मिळणाऱ्या सोयी सुविधांच्या अभावामुळे त्यांच्यावर आमरण उपोषण करण्यास वेळ आली आहे.
भारत देशाच्या स्वातंत्र्याची वाटचाल पंच्याहत्तर वर्षात होत आहे परंतु ते बोलण्या पुरताच मर्यादित आहे का? स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी सण साजरा करत असताना रायगड जिल्ह्यातील आदिवासी मात्र त्यांच्या मूलभूत सुविधांपासून आजतागायत वंचित आहेत त्यामुळे या जिल्ह्यात नक्की चाललंय काय येथील राजकारणी मंत्री मोहदय करतात काय असा प्रश्न आता सर्व सामान्य माणसाला पडला आहे.
रायगड जिल्ह्यत सुमारे १६० आदिवासी वाड्या वन विभागाच्या हलगर्जीपणामुळे रस्ता वीज पाणी यासारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित असल्यामुळे ते आज देखील न्यायाच्या प्रतीक्षेत असून त्यांना या मुलभूत सुविधा मिळणार कधी असा सवाल उठला असून सदरच्या वाडयांपैकी पनवेल तालुक्यातील आपटा ग्रामपंचायत हद्दीतील कोरललवाडी आदिवासी वाडीच्या रस्त्याची प्रशासकीय मंजुरी मिळालेली असून देखील मागील दीड दोन वर्षापासून याचा निधी फंड खात्यात पडून असल्याचे संकेत मिळत आहेत.मात्र या राज्यात सरकारी काम आणि बारा महिने थांब या अवस्थेत वनविभाग अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे अखेर आज दिनांक ११ जानेवारी २०२२ रोजी कोरलवाडी येथील ग्रामस्थानी व ग्राम संवर्धन अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्याचे उप वनसंरक्षक अधिकारी आशिष ठाकरे यांच्या कार्यालयासमोरच बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
मागील दीड दोन वर्षांपासून या आदिवासी वाडी कडे जाणाऱ्या मार्गाचा निधी विना वापर पडून या गांभीर्यपूर्वक गोष्टींकडे वन विभाग जाणीव पूर्वक टाळाटाळ करीत असल्यामुळे अश्या वन अधिका-यांवर सेवा हमी कायदा व दप्तर दिरंगाई कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी तसेच या कामासाठी मंजूरी दिल्याशिवाय हे उपोषण मागे घेतले जाणार नसल्याचा निर्धार उपोषणकर्ते गुरुदास वाघे, भानुदास पवार, हरिश्चंद्र वाघे, संतोष पवार, सचिन वाघे, महेंद्र वाघे, राजेश वाघे, अनिल वाघे, अक्षय घाटे, सुनील वाघे, रवींद्र वाघे, लक्ष्मण पवार आणि रमेश वाघे यांनी केला आहे.
आपटा ग्राम पंचायतीचे उप सरपंच वृषभ धुमाळ, ग्रामपंचायत सदस्य मारुती चव्हाण आणि सामाजिक कार्यकर्ते दर्शन भोईर ऍड. आकाश म्हात्रे, ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे प्रकल्प समन्वयक उदय गावंड यांनीही या उपोषणास पाठिंबा दर्शविला आहे.
स्वातंत्र्यानंतर ही पनवेल तालुक्यातील कोरलवाडी आदिवासी बांधवांना रस्त्यासारखी मूलभूत सुविधा अजूनही उपलब्ध होत नाही,आणि या साठी आजूनही आदिवासी समाजाला उपोषण करावं लागतं आहे.या सारखे दुसरे दुर्दैव ते काय आहे?
ReplyDeleteअलिबाग येथे बेमुदत उपोषण
आपल्या न्याय हक्काच्या लढाईला लवकरात लवकर यश मिळावे✊🏻✊🏻✊🏻✊🏻
!! जय आदिवासी जय नाग्या कातकरी !!
👍👍🙏
ReplyDelete