धुक्यात हरवला रोहा कोलाड मार्ग,प्रदूषणामुळे डोळ्यांची चुर चुर विद्यार्थ्यांसह कामगारांना वाट काढतांना करावी लागते तारेवरची कसरत!


कोलाड (श्याम लोखंडे) धुक्यात रोहा कोलाड मार्गावर गेली दोन दिवसांपासुन जोरदार धूका आणि धुक्यात हरवत असलेल्या वाटा असे चित्र पहावयास मिळत असुन या धुक्यामुळे मॉर्निंग वाक करणाऱ्यांसाठी हा सुखद धक्का असला तरी शाळाकॉलेजला व कामावर जाणारे कामगार वर्ग,दुध विक्रेते व विविध व्यवसाय करणारे व्यवसायिक यांच्यासाठी यातुन वाट काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे तर रोहा कोलाड मार्गवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तर अक्षरशः दमछाक होते एम आय डी सी कारखान्यांतून हवेत प्रदूषित होणारं केमिकलयुक्त प्रदूषण त्याने होणारी डोळ्यांची चुर चुर धुक्यात न दिसणारी वाट त्यामुळे मोठी तारेवरची कसरत तर अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहे.

                  धुक्यामुळे रोहा कोलाड मार्गावरील जैनवाडी ते किल्ला या परिसरात तर अक्षरशः प्रदूषणाचा विळखा हवेत मिश्रीत होणारे केमिकलयुक्त प्रदूषण त्यात पडणारी खार (दव) त्यामुळे पुढून मागून येणारी वाहने देखील दिसत नाही तर नाका तोंडात तसेच केमिकलने होणारी डोळ्यांची चुर चुर याचा परिणाम मानवी आरोग्यासाठी धोकादायक आहे. हुडहुडी भरविणारा डिसेंबर महिना सरला तरी गुलाबी थंडीची चाहुल लागत नव्हती निसर्ग नियमानुसार ऋतु चक्र चालण्याचे दिवस बदलत चालले असुन याचे प्रत्यय आपणास येत असुन कधी गरम तर कधी पाऊस अशी परिस्थिती नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याच्या शेवट पर्यत दिसुन येत आहे परंतु उशिरा का होईना २०२१ या वर्षाच्या शेवटी व जणु २०२२ या वर्षाच्या स्वागताला गुलाबी थंडीची जोरदार चाहुल अखेर हळूहळू लागत असुन बाजारपेठेत उबदार कपडे खरेदीसाठी लोकांची गर्दी दिसुन येत आहे.


दिवसेंदिवस काळ बदलत चालला असुन संगणक युगात जो तो मोबाईल व दूरदर्शन मध्ये गुंतला असुन थंडीच्या वेळी शेकोटी सभोवताली उब घेऊन गप्पा मारणारे यांचे प्रमाण ही कमी झाले.रिती रिवाज परंपरा बदलत चालल्या असुन याच प्रमाणे निसर्ग ही बदलत चालला आहे.परंतु उशिरा का होईना गुलाबी थंडी सूरू झाली असुन याचा आनंद उपोभोगत असतांना सकाळी या धुक्यातून वाट काढतांना आपले लक्षही विचलित होऊ देऊ नये याचे भान सर्वानी ठेवने आवश्यक आहे ,

Comments

Popular posts from this blog