रोहा तालुका शेतकरी विकास प्रतिष्ठानचा ५ वा वर्धापनदिन ९ डिसेंबर रोजी,

कोलाड (श्याम लोखंडे ) रोहा तालुक्यातील शेतकरी वर्गासाठी मौलिक वरदान ठरत असलेला रोहा तालुका शेतकरी विकास प्रतिष्ठानचा ५ वा वर्धापन दिन,व कृषि दिनदर्शिका २०२२ प्रकाशन, तसेच शेतकरी सन्मान सोहळा ९ डिसेंबर रोजी शासकीय विश्राम सभागृह सागर डेरी जवळ रोहा, सकाळी १०:०० वाजता होत असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश भगत यांनी दिली आहे ,कार्यक्रम सकाळी १०:००ते दु.१:०० वाजेपर्यंत शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे. वरील कार्यक्रमात मत्स्यशेती, सेंद्रिय शेती, दुग्ध व्यवसाय कृषि फलोत्पादन सिंचन विविध योजना या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

रोहा तालुक्यातील शेतकरी वर्गासाठी उपक्रमशील शेती विषयक विविध माहिती प्रशिक्षण राबवत असलेल्या तसेच शेतकऱ्यांना अधिक स्फुर्ती देणारा सन्मान सोहळ्यात या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे व मुख्य मार्गदर्शक सौ. उज्वलाजी बानखेले (जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रायगड) विषय: कृषि फलोत्पादन सिंचन विविध योजना, डॉ सुभाषजी म्हस्के ( उपायुक्त पशुसंवर्धन विभाग रायगड) विषय: दुग्धव्यवसाय कुक्कुटपालन, डॉ विवेकजी वर्तक ( मत्स्य शास्त्रज्ञ खार जमीन संशोधन केंद्र पनवेल):विषय: मत्स्यशेती, संदीपजी कांबळे ( सेंद्रिय शेती तज्ञ खानु रत्नागिरी) : विषय: सेंद्रिय शेती मनोजजी तलाठी (कार्यक्रम समन्वयक कृषि विज्ञान केंद्र किल्ला)विषय: एकात्मिक शेती पद्धत ,आदी मान्यवरांच्या हस्ते सन 2022 च्या दिनदर्शिका प्रकाशन व तालुक्यातील प्रगतशील शेतकरी सन्मान सोहळा संपन्न होत असून शेतकरी वर्गासाठी मोलाचे मार्गदर्शन या अतिथींचे लाभणार असून तालुक्यातील बहुसंखे शेतकरी वर्गाने याचा लाभ घ्यावा असे आवाहन रोहा तालुका शेतकरी प्रतिष्ठानच्या करण्यात येत आहे.

Comments

Popular posts from this blog