रोहा भालगाव पंचायत समिती गणात राष्ट्रवादी काँग्रेसचा झंझावात!
अनेक ग्रामस्थांनी केला पक्षप्रवेश!
कोलाड (श्याम लोखंडे ) रोहा तालुक्यात आगामी पंचायत समिती,जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भालगाव विभागात सुरू असलेल्या घडामोडींकडे संपूर्ण रोहा तालुक्याचे लक्ष लागले आहे.भालगाव विभागातील विकासकामे, दलित-आदिवासींचे प्रश्न फक्त राष्ट्रवादी काँग्रेस सोडवू शकतो असा संदेश समाजातील सर्व घटकांपर्यत पोहचला आहे.त्यामुळेच दुर्गम भालगाव पंचायत समिती गणामध्ये जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.त्याचीच परिणिती म्हणून भालगाव विभागातील अनेक ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
रोहा तालुक्यातील भालगाव ग्रामपंचायत हद्दितील कांडणे खुर्द बौद्धवाडी या गावातील शेकाप,शिवसेना कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.कांडणे खुर्द बौद्धवाडी गावातील विकास कामे ठप्प झाली होती.दलितांचे रखडलेले प्रश्न मार्गी लावायचे होते ,विकास कामांना गती देणार कोण?असे प्रश्न असताना ग्रामस्थांनी राष्ट्रवादी पक्षावर विश्वास ठेवून पक्ष प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. खासदार सुनिलजी तटकरे साहेब,पालकमंत्री आदिती तटकरे व आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्यावर नेतृत्वावर विश्वास ठेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.पक्ष प्रवेश करण्याआधी त्यांनी पालकमंत्र्यांकडे काही विकासकामे सुचवली होती. महिलांचा पाण्याचा प्रश्न, गावांतील अंतर्गत रस्ते अशा विविध कामांची मागणी केली होती. त्या कामांचा शुभारंभ दिनांक २६ नोव्हेंबर २०२१ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विजयराव मोरे, कार्याध्यक्ष मधुकरजी पाटील,तालुका अध्यक्ष विनोदभाऊ पाशिलकर, रोहा तालुका युवती अध्यक्षा रविना मालुसरे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.त्यानंतर भालगावमध्ये आढावा बैठक पार पडली. या बैठकीमध्ये विविध विकास कामांबाबत चर्चा झाली. या कार्यक्रमाला अनिल भगत प्रदीप कदम,अशोक बैकर,प्रदीप दामुगडे ,चंद्रशेखर पवार, तुकाराम चालकर, जगन्नाथ कुंटे, उदय शेलार ,बिरजू धामणे ,संतोष मोहिते ,लक्ष्मण मोहिते,वसंत मोहिते ग्रामस्थ तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.दगडू मोहिते शेकापक्ष ,जनार्दन मोहिते, शिवसेना माजी सरपंच घनश्याम मोहिते व इतर अनेक ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भालगाव पंचायत समिती गणात सुरू केलेली हि मोहिम संपुर्ण तालुक्यात पोहचली असुन कार्यकर्त्यांचा पक्षावरचा विश्वास अधिक दृढ होताना दिसत आहे.
Comments
Post a Comment