अवकाळी पावसामुळे कडधान्य पिकाला धोक्याची घंटा!

 शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ, जनजीवनावर परिणाम!

कोलाड (श्याम लोखंडे ) बळीराजाच्या नशिबी सुगीचे दिवस नाहीच या ना त्या कारणाने बळीराजा कायम ग्रासला आहे. त्याच्यावर अनेक प्रकारचे संकट येत असतात जात असतात मात्र तो कधीच खचून जात नाही संपूर्ण जगाचा पोशिंदा समजला जातो सर्वांचीच भूक भागवण्याचे काम कवाड कष्ट करत तो भागवत असतो मागील दोन वर्षे त्याच्यावर अनेक संकट त्यातच गेल्या पाच ते सहा दिवसापासून ढगाळ वातावरणानंतर तसेच दुपार नंतर पडत असलेल्या धुवांधार अवकाळी पावसामुळे रोहा तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यातच त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. असून शेतकरी-बागायतदारांच्या चिंतेत प्रचंड वाढ झाली आहे.रोहा तालुक्यात खरिपाच्या पिकानंतर शेतकरी कडधान्य व भाजीपाला पीक घेतात परंतु शेतात पाणी साचून राहिल्याने या पिकांना आता धोक्याची घंटा सुरू झाल्याने अनेक शेतकऱ्यांना चिंतेचे ग्रहण लागले असून अधिक कसरत करावी लागत आहे.

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाज पूर्वसूचनेनुसार दिनांक१७ ते २१ नोव्हेंबर २०२१ या कालावधीमध्ये बंगालच्या उपसागरामध्ये व अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असल्याने रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी गडगडाटासह विजा चमकणार असून पाऊस व वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला होता मात्र हे अंदाज खरे ठरत असून सदचा कोसळत असलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे नुकसान झाले असून यात प्रामुख्याने भात पिकांचे अधिक प्रमाणात नुकसान झाले तर कडधान्य पिकांसह भाजी पाला लागवड व फळ बागायतदारांना मोठा नुकसान सोसावे लागणार असल्याचे दिसून येत आहे. 

गेल्या पाच सहा दिवसांपासून वीजांच्या गडगडाटासह पडत असलेल्या या अवकाळी पावसामुळे रोहा तालुक्यातील दुर्गम व ग्रामीण भागातील काही शेतकऱ्यांच्या शेतात कापून ठेवलेले भात पिक भिजल्याने नुकसान झाले आहे.शेतात कडधान्य पेरलेल्या वाल,मटकी, मूग,तूर,चना, आदी. फळ भाजी-पाला व आंबा पिकांवर याचा मोठा परिणाम होण्याची चिंता आता सर्वत्र व्यक्त होत असून या अवकाळी पावसामुळे येथील शेतकरी व बागायतदारांच्या चिंतेत अधिक वाढ झाली असल्याने बळीराचा चिंताग्रस्त झाला आहे,

तरी शासनाने याची गांभीर्याने दखल घेत शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करून त्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे .

Comments

Popular posts from this blog