माय बाप सरकारची काय गाढवं मारली,की नशिबात बारा वर्षे नाकातोंडात धूळ,आंबेवाडी कोलाड,खांब,ग्रामस्थांचा संतप्त सवाल?
कोलाड (श्याम लोखंडे) मुबंई गोवा महामार्ग चौपदरीकरनाचे काम गेली दहा ते बार वर्षे सुरू आहे त्यात पहिला टप्पा म्हणून पनवेल पलस्पे ते इंदापूर असा सत्तर ते ऐंशी कि.मि. अंतराच्या कामाला धडाकेबाज तात्कालीन सरकारने सुरुवात केली मात्र याला आता एक तप पूर्ण झाला त्यामुळे माय बाप सरकारा आमच्या हातून काय पाप घडले की त्याचे फलीत गेली बार वर्ष सदरच्या मार्गावरील आंबेवाडी कोलाड ,खांब,येथील रहीवासी नागरिकांच्या नशिबी कोणते भोग आले आहेत की त्यांना या जन्मी रस्त्यामार्गावरील वाहनांच्या वर्दळीमुळे प्रदूषित होत असलेली धूळ खावी लागत आहे त्यामुळे खांब कोलाड आंबेवाडी येथील नागरिकांकडून संताप जनक सवाल व्यक्त केला जात आहे .
मुबंई गोवा महामार्गारील पेण, वडखळ,नागोठणे, वाकण, खांब,कोलाड आंबेवाडी नाका,वरसगाव,तळवली तिसे, सह इंदापूर पर्यंतच्या मार्गावर अक्षरशः धूळ प्रदूषित मार्ग बनला आहे महामार्गावरील हवेत प्रदूषित होत असलेली धूळ त्यात खड्डेमय प्रवास धुळीची कोंडी डोळ्यात नाकातोंडात धूळ गेल्याने अधिक डोक्याला ताप त्यामुळे प्रवास करण धोकादायक ठरत आहे तर त्यात नागरिकांचा जीव कासावीस होत आहे रस्ता महामार्ग चौपदरी करणात शेतजमिनी घरे दारे तर काही व्यवसाय करत असणारी दुकाने देखील गेली त्याचा पुरेसा भूधारकांना मोबदला देखील मिळाला नाही तर आजपर्यंत ते उर्वरित मोबदला मिळेल या प्रतीक्षेत आहेत.
महामार्गावरील कोलाड आंबेवाडी नाका येथील स्व द ग तटकरे चौकात तर अक्षरशः धुळीच्या कोंडीत येथील नागरिकांचा जीव गुदमरतोय तर खांब नाक्यावरील घराघरात तसेच व्यवसायिक दुकानदार यांचे धुळीचे थरावर थर चढत असून ही धूळ हानिकारक ठरत आहे तसेच भाजीवाले, चहा, वडापाव, पान टपरी वाले , पाणी पूरी, चायनिस भेळ, फळ ,फुल ,शीतपेय विक्रेतेच्या तर चक्क व्यवसायावर या धुळीचा परिणाम होत असल्याचा संताप व्यक्त करत आहेत.
गेली अनेक वर्षे सुरू असलेल्या व रखडलेल्या महामार्गाच्या कामाबाबत भयानक पडलेल्या खड्यांबाबत व कोलाड कुंडलिका नदीपात्रावरील व पुई येथील माहिसदरा पुलाचे काम मार्गालगतचे असलेल्या वरसगाव, कोलाड आंबेवाडी,पुई,गोवे,पुगाव,मुठवली, खांब,वाकण नागोठणे येथील आदी ग्रामस्थ व व्यवसायिक यांनी मागील चार सहा महिन्यांपूर्वी रायगडचे लोकप्रिय खासदार सुनील तटकरे यांची भेट घेत ठेकेदाराने केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत निवेदन दिले तद्नंतर दस्तुरखुद्द खासदार तटकरे यांनी या बाबत खरपूस समाचार घेत संबधित अधिकारी वर्गासमावेत ठेकेदाराला सज्जड दम भरत या कामांची दुरुस्ती व उपाय योजना कराव्यात आशा स्पष्टपणे ग्रामस्थ नागरिकांसमोर सांगण्यात आले मात्र त्यावर उपाय योजना सोडाच परंतु दररोज 24 तास होत असलेल्या जड अवजड वाहनांची वाहतूक आणि त्यातून पावसाळ्यात बुजविण्यात आलेल्या खड्डी मिश्रीत मातीचे हवेत प्रदूषित होत येथील प्रवासी नागरिक तसेच ग्रामस्थ रहवासी व व्यवसायिकांच्या जीवावर वेतले असल्याचा संताप जनक सवाल व्यक्त केला जात आहे ,
तरी संबधित अधिकारी वर्गाने याची गांभीर्याने दखल घेत प्रदूषित होत असलेल्या धुळीवर उपाय योजना करण्यात याव्या अशी मागणी येथील व्यवसायिक प्रवासी व ग्रामस्थांनी केली आहे.
Comments
Post a Comment