प्रा.आमलपुरे सूर्यकांत अवगत २०२१या पुरस्काराने सन्मानित 

   गोवे-कोलाड(विश्वास निकम )  येथील डाॅ .श्री .नानासाहेब धर्माधिकारी काँलेज मधील हिंदी विषयाचे प्राध्यापक, हिंदी विभाग प्रमुख श्री. आमलपुरे सूर्यकांत यांना अक्षरवार्ता  आंतरराष्ट्रीय शोधपत्रिका व कृष्ण बसंती शैक्षणिक व सामाजिक जनकल्याण समिती उजैन, मध्य प्रदेश येथून२०२१ या वर्षी चा अवगत सन्मान पुरस्कार देण्यात आला असून हा पुरस्कार त्यानी केलेल्या शोध कार्या साठी दिलेला आहे. गेली १२ वर्षा पासुन शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून ४०शोध निबंध प्रकाशित झाले असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर ४०चर्चा सत्रात सहभागी झाले असून ३ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन हा मानाचा पुरस्कार देण्यात आला आहे. 

   या यशाबाबत संस्थेचे सचिव संदीपजी तटकरे, सर्व पदाधिकारी, प्राचार्य शंकर मुंडे, सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेततर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील कार्या साठी शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog