उदय घोसाळकर यांना आदर्श शिक्षकेत्तर पुरस्कार 

            गोवे-कोलाड (विश्वास निकम )

          द. ग. तटकरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोलाड हायस्कूलचे लेखनिक उदय पंढरीनाथ घोसाळकर यांना आदर्श शिक्षकेत्तर पुरस्कार देण्यात आला.

           शुक्रवार दि.१ ऑक्टोबर २०२१ रोजी रायगड जिल्हा परिषद अलिबाग शिक्षण विभागाचा आदर्श शिक्षक व शिक्षकेत्तर पुरस्कार वितरण सोहळा कर्जत येथे संपन्न झाला.या पुरस्कार सोहळ्यात द. ग. तटकरे माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूल विद्यालय कोलाड चे लेखनिक श्री उदय पं. घोसाळकर यांना २०२०-२०२१ या वर्षाचा आदर्श शिक्षकेत्तर पुरस्कार रायगडच्या पालकमंत्री आदितीताई तटकरे यांच्या सुभेहस्ते प्रदान करण्यात आला. या पुरस्काराबद्दल उदय घोसाळकर यांचे सुधागड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष वसंतराव ओसवालसाहेब,कार्यवाहक गीताताई पारलेचा,सचिव रविंद्र घोसाळकर,मिलिंद जोशी सर, आंबेवाडी ग्रामपंचायत सरपंच सुरेश महाबळे, द.ग.तटकरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोलाडचे प्राचार्य शिरीष येरुणकर,तिरमलेसर,पालवे सर,अविनाश माळी,डी.आर पाटील सर,घोणे सर,तटकरे मॅडम, देशमुख मॅडम, पर्यवेक्षक देशमुख सर,शरद चव्हाण,विजय साखरले,नागोठकर सर, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करुन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog