आंबेवाडी येथील तानाजी फार्म हाऊसवर चोरट्याने मारला डल्ला ,७००००रु. किंमतीचा माल लंपास
(संग्रहीत छायाचित्र ) |
गोवे-कोलाड (विश्वास निकम ) रोहा तालुक्यातील आंबेवाडी गावाच्या हद्दीतील मुंबई-गोवा हायवेवरील रेल्वे ब्रिजच्या लगत असणाऱ्या तानाजी शेडगे फार्म हाऊस वरील बंगल्यावर सोमवार दि.४ ऑक्टोबर २०२१ रोजी ७०००० रुपयांचा माल लंपास केला.
या बाबत कोलाड पोलिस सूत्रांन कडून मिळालेल्या माहिती नुसार आंबेवाडी गावाच्या हद्दीतील मुंबई गोवा हायवे कोकण रेल्वे ब्रिजच्या लगत असणाऱ्या तानाजी शेडगे यांच्या फार्म हाऊसवरील बंगल्यावरील स्लायडींग खिडकीचे लॉक तोडून त्यावाटे आत शिरून सॅमसंग कंपनीचे ३५००० रुपये किंमतीचे दोन ४० इंचचे दोन एल.ई.डी टीव्ही असे एकूण ७० हजार किंमतीचा माल चोरट्याने लंपास केला असुन याबाबत कोलाड पोलिस ठाण्यात पोस्टे गुरनं ००८१/ २०२१ भा.वि.द.क.४५७,३८०,३४प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून कोलाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह.एम. आर. गायकवाड सह अधिक तपास करीत आहेत.
Comments
Post a Comment