लायन्स क्लब ऑफ कोलाड रोहा च्या वतीने कोलाड येथे मोफत डायबेटीस तपासणी 

कोलाड (श्याम लोखंडे) लायन्सक्लब ऑफ कोलाड रोहा,लायन्सक्लब रोहा ,व Aimil Pharamaceuticals india Ltd यांच्या विद्यमाने तसेच डॉ विनोद गांधी यांच्या सहकार्याने शुक्रवार दिनांक 8 ऑक्टोबर 2021 रोजी कोलाड येथे मोफत डायबेटीस रुग्णांची तपासणी व त्यांना औषधे उपचार असे शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

शुक्रवार दिनांक 8 ऑक्टोबर रोजी आंबेवाडी कोलाड येथील डॉ गांधी नर्सिंग होम. कोलाड रोहा मार्ग आंबेवाडी कोलाड या ठिकाणी ठीक सकाळी 10 वा.ते दुपारी 2 वा. या वेळेत या ठिकाणी रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषध उपचार करण्यात येणार असून या करिता डॉ गांधी हॉस्पिटल मो 7757949888

नंदकुमार कळमकर मो 7719801974

डॉ श्याम लोखंडे मो 7798719832   पत्रकार विश्वास निकम मो.9975327995

दिनकर सानप मो 7219546768 या क्रमांकावर संपर्क साधून आपली नावे नोंदवावी असे आवाहन लायन्सक्लब ऑफ कोलाड रोहा चे सचिव रवींद्र लोखंडे यांनी आवाहन केले आहे .

Comments

Popular posts from this blog