गोवे येथे सुनिल तटकरे युवा

 प्रतिष्ठान तर्फे आदिवासी

 बांधवाना धान्याचे किट वाटप

                             गोवे-कोलाड (विश्वास निकम )

               गुरुवार दि.२३ सप्टेंबर २०२१ रोजी आमदार अनिकेतभाई तटकरे व रायगडच्या पालक मंत्री आदितीताई तटकरे यांच्या माध्यमातून सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठान तर्फे गोवे येथील आदिवासी बांधव यांना धान्यचे किट वाटप करण्यात आले.

                  वीट भट्टी तसेच इतर ठिकाणी मोल मजुरी करणारा आदिवासी समाज याला पावसाळ्यात जून नंतर दसऱ्या पर्यंत कोणतेही काम उपलब्ध नसते यामध्ये दोन वर्षां पासुन कोरोनाच्यामुळे अनेकांचे काम बंद असल्यामुळे आदिवासी बांधव यांच्यावर उपसमारीची वेळ आली आहे. यामुळे सामाजिक बांधिलकी जाणीव राखत अनेक वर्षापासून कोलाड विभागात सुनिल युवा प्रतिष्ठान तर्फे जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात करण्यात येत आहे.

                सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठान तर्फे आदिवासी बांधव तसेच विविध समाजातील गरजुना अनेक दिवसांपासून धान्याचे किट वाटप करणे हा उपक्रम सुरु असून गोवे येथील आदिवासी बांधव यांना सुनील तटकरे युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते संदीप जाधव, गोवे ग्रामपंचायत उपसरपंच नितीन जाधव,सदस्य नरेंद्र पवार,सदस्या सौ सुप्रिया जाधव,भावना जवके यांच्या हस्ते गोवे येथील आदिवासी बांधव यांना धान्याचे किट वाटप करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog