आदिवासी समाजाला शवरुग्णवाहीका विनामूल्य मिळणेबाबत आदिवासी कातकरी संघटनेने रायगड जिल्हाधिकारी, जिल्हाआरोग्य अधिकारी, यांना दिले निवेदन
शव रुग्णवाहिका नसल्याने रायगडातील आदिवासी कातकरी समाजाची होते हेळसांड
आदिवासी समाजाकडे मते मागणार्यांना जाग येईल का?
रायगड ( भिवा पवार) रायगड जिल्ह्यामध्ये आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात असून हातावर कमावून पानावर खाणारा हा कष्टकरी समाज खूप हलाखीचे जीवन जगत आहे. रायगड जिल्ह्यातील आदिवासी समाजाचा शैक्षणिक, सामाजिक,आर्थिक, सांस्कृतिक, विकास झालेला नाही. आदिवासी समाज भारताचा मूळ मालक असताना खूप हलाखीचे जीवन जगत आहे त्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे त्यातीलच महत्त्वाची समस्या म्हणजे आरोग्याची समस्या असून रायगड जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना मोफत व शव रुग्णवाहिका मिळावी यासाठी रायगड जिल्हा आदिवासी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान नाईक यांनी जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग जिल्हा आरोग्य अधिकारी अलिबाग यांना निवेदन दिले आहे याबाबत पत्रकारांना दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात त्यांनी असे म्हटले आहे की अलिबागला सरकारी हॉस्पिटलमध्ये एखादा रुग्ण दगावला तर शव रुग्णवाहिका भाड्याने करावी लागते मात्र हे भाडे आम्हाला परवडत नसून अलिबागच्या बाहेर बॉडी घेऊन जायचे असल्यास 4000 ते 5000 रुपये मोजावे लागतात हे पैसे सुद्धा आमच्या आदिवासी समाजा जवळ नसतात कारण हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी 108 किंवा रिक्षाने दवाखान्या मध्ये दाखल केले जाते मात्र मृत्यू झाल्यानंतर शव रुग्णवाहिका करण्यासाठी भाड्याने केली तर पैसे पैसे एखाद्या मालकाकडून किंवा सावकाराकडून घेऊन रुग्णवाहिका धारकास द्यावे लागतात आदिवासी बांधवांना पैसे देणाऱ्या कडे आदिवासी बांधवांना वर्षभर काम करावे लागते यापुढे याच्या अगोदर डॉक्टर गवळी सिव्हिल सर्जन असताना शव रुग्णवाहीका विनामूल्य द्यायचे मात्र आता आदिवासी बांधवांना मोठ्या प्रमाणामध्ये हेळसांड होत आहे तरी आम्ही आदिवासी बांधवांना व रुग्णवाहिका विनामूल्य मिळावी असे निवेदन जिल्हा आरोग्य अधिकारी अलिबाग तसेच जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग यांना निवेदनाद्वारे रायगड जिल्हा आदिवासी कातकरी समाज संघटना अध्यक्ष भगवान नाईक यांनी मागणी केली आहे
Help for St cast samaj
ReplyDeleteYes
Delete