महाड-पोलादपूर मार्गावर बेकायदा खैर तस्करी करणारा ट्रक पकडला, 3 लाख 47 हजारांचा मुद्देमाल जप्त 

  वनविभाग फिरते पथकाची

      धडक कामगिरी 

रोहा (समीर बामुगडे) : महाड तालुक्यातील मौजे कापडे महाबळेश्वर पोलादपूर मार्गावर खैर सोलिव लाकुड वाहतूक करत असताना शुक्रवारी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास वनविभागाच्या पथकाने कारवाई केली. यात टाटा 407 टेम्पो क्रमांक MH.04.EL.2288आणि खैर सोलिव नग 231 घमि-2.916 किंमत 347047/- रुपयांचा मुद्देमाल वाहनासह जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी गजानन यशवंत दिघे चालक मालक (रा. ढालकाठी, ता. महाड) व निलेश गंगाराम साळवी (रा. रेपोली) सहआरोपी दीपक महाडिक (रा. दापोली) यांच्यावर वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या बाबत अधिक माहिती अशी की, उपवसंरक्षक रोहा व सहाय्यक वनरक्षक रोहा यांच्या मार्गदर्शनाखाली फिरते पथक रोहा यांना मिळालेल्या गुप्त बातमी वरून शुक्रवारी सायंकाळी 7.30 वा. टाटा 407 टेम्पो क्रमांक MH/04/EL/2288 मौजे कापडे महाबळेश्वर पोलादपूर मार्गावर थांबवून तपासले असता त्यामधे खैर सोलिव लाकडे विनापरवाना आढळून आली संबंधित वाहनावर वनविभागाच्या फिरते पथकाने कारवाई करत वनक्षेत्रपाल महाड यांचे कार्यालय येथे वाहन मालासह जप्त करून आणली. ही कारवाई उपवसंरक्षक रोहा श्री. अप्पासाहेब निकत व सहाय्यक वनसंरक्षक रोहा श्री. विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल फिरते पथक रोहा श्री. इच्छात कांबळी, वनरक्षक फिरते पथक रोहा अजिंक्य कदम, वनरक्षक पोपट करांडे यांच्या विशेष पथकाने केली. पुढील तपास चालू आहे.
Comments

Popular posts from this blog