रोहा पंचायत समितीच्या सभापतींनी घेतली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी पेण,यांची भेट,
आदिवासी समाजाला भेडसावणाऱ्या समस्या, शिक्षण, आरोग्य, वैयक्तिक योजना, याबाबत केली चर्चा
रायगड (भिवा पवार ) रोहा पंचायत समितीच्या सभापती गुलाब ताई वाघमारे यांनी 23 सप्टेंबर रोजी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण रायगड कार्यालयास भेट दिली त्या वेळी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील सहायक अधिकारी सतीश शरमकर योगेश पाटील वाघ मॅडम, दळवी, या अधिकाऱ्यांशी आदिवासी समाजाला भेडसावणाऱ्या समस्या तसेच रोहा तालुक्यातील कवळटे आदिवासीवाडी यांचे पुनर्वसन करण्याची मागणी तसेच धामणसे वाडीतील अंतर्गत रस्ता शेनवई आदिवासीवाडी नळपाणी योजना मंजूर करण्याबाबत तसेच शिक्षण, आरोग्य,वैयक्तीक योजना, याविषयी चर्चा केली त्यावेळी कातकरी आदिम संघटना महाराष्ट्र राज्य रायगड जिल्हाध्यक्ष लहू वाघमारे रायगड जिल्हा कातकरी समाज जिल्हाध्यक्ष भगवान नाईक सुरेश नाईक गंगाराम शिद सुधाकर शिद आदिवासी कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment