आंबेवाडी गावचे सुपुत्र समीर साळुंके भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त,आंबेवाडी येथे सेवापुर्ती गौरव मिरवणूक 

  कोलाड (विश्वास निकम )रोहा तालुक्यातील आंबेवाडी गावाचे सुपत्र समीर सदानंद साळूंके हे भारतीय सैन्य दलातून ३१ डिसेंबर २०२५ रोजी सेवानिवृत्त झाले असुन या निमित्ताने शुक्रवार दि.२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता मुंबई-गोवा हायवे वरील आंबेवाडी बाजारपेठेतील अंबर सावत महाराज मंदिर येथून पुई-गोवे रस्त्यावर असणाऱ्या त्यांच्या निवास्थानापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली.

  देशाची सेवा करणाऱ्या भारतीय सैनिकाचा सर्वाना अभिमान असतो.आंबेवाडी गावचे सुपत्र समीर सदानंद साळूंके हे काश्मीर सह देशाच्या विविध राज्यात १७ वर्षे ६ महिने देशसेवा करून सेवानिवृत्त झाले.काश्मीरच्या गुलाबी थंडीत हिरव्या रंगाच्या वेशात देशाची सेवा करणे भाग्यवान व्यक्तीच्या नशिबात असते.




ज्यावेळी भारतीय सैन्य दलातून सेवकरून भारतीय सैन्यातुन सेवानिवृत्त होतो. त्यावेळी त्या भारतीय सैनिकाचे आई-वडील,पत्नी,संपूर्ण कुटूंबासहित त्या परिसरातील नागरिकांना सार्थ अभिमानाचा असतो.

  याप्रमाणे आंबेवाडी गावचे सुपुत्र समीर सदानंद साळूंके यांनी भारतीय सैन्य दलात देश सेवा करून सेवा निवृत्त झाले.त्यांचा सेवापूर्ती सेवा निमित्ताने आंबेवाडी बाजारपेठेतुन बेंजो पथकाच्या तालावर भव्य मिरवणूक काढण्यात आली.यावेळी आंबेवाडी ग्रामस्थ,बाजारपेठेतील व्यापारी वर्ग,नाभिक समाज,तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.उपस्थित सर्व नागरिक यांनी समीर साळूंके सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog