रायगड जिल्ह्यातील घटना! 

वणवा पेटला केले रुद्ररूप धारण, रोहा इंदरदेव येथील डोंगराला अचानक वनवा, चाळीस ते पन्नास घरे जळून खाक, वनसंपदेची प्रचंड हानी प्रांताधिकारी, तहसीलदार,यांनी घटनास्थळी धाव घेत केली पाहणी

 मतांसाठी लोटांगण घालणारे नेते गेले कुठे जनतेचा सवाल?

 निवडणुका जवळ आल्या असत्या तर रायगडातील नेत्यांच्या रांगच रांगा लागल्या असत्या!

कोलाड (विश्वास निकम) रोहा तालुक्यातील धामणसई ग्राम पंचायत हद्दीतील डोंगर माथ्यावर असलेल्या इंदरदेव धनगरवाडी येथे अचानक डोंगराला वणवा लागल्याने सदरच्या वनव्याने रुद्ररूप धारण केल्याने वस्तीतील चाळीस ते पन्नास घरे या वनव्यात जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.मात्र दैव बलवत्तर घडलेल्या घटनेत कोणतेही जिवीत हानी घडली नाही. परंतु आगीत घरांचे खूप मोठे नुकसान झाले त्याच बरोबर वनसंपदेची देखील प्रचंड हानी झाली असून धनगरवाडीवरील ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले. रोहयाचे कार्यतत्पर कर्तव्यदक्ष प्रांत अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांना धीर देत केली पाहणी.

वन विभागाचा हलगर्जीपना अखेर वाडीवर ग्रामस्थांच्या घरांवर बेतला डोंगर माथ्यावर असलेल्या इंदरदेव धनगरवाडी येथील डोंगराला गुरुवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास अचानक वणवा लागण्याची घटना घडली तर लागलेल्या वनव्याने हा हा म्हणता रुद्ररूप धारण केले आणि इंदरदेव वस्तीतील घरांच्या वस्तीत पेटता वानवा शिरल्याने येथील संपूर्ण घरे या वनव्यात जळून खाक त्यात त्याचे जीवनावश्य वस्तू आणि महत्वाचे सामान सुमानाची राख रांगोळी झाल्याने ग्रामस्थांवर मोठे संकट ओढवले आहे. वनव्यावर नियंत्रण करण्यासाठी मदत बचाव कार्य करण्यासाठी कोलाड येथील एस व्ही आर एस एस टीम, धाटाव येथील दीपक नायट्रेट कंपनी येथील अग्निशमन दल, वनविभाग, वरती पाण्याचा देखील अभाव तरी देखील सामाजिक संस्था, पंचायत हद्दीतील ग्रामस्थ युवक यांनी तत्काळ धाव घेत प्रसंग सावध राखत शर्थीचे प्रयत्न करत या वनव्यावर नियंत्रण मिळविले.मात्र या घटनेत कोणतीही जीवितहानी घडली नसून घरांचे तसेच घरात असलेल्या जीवनावश्यक वस्तूंचे जळून खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच यावेळी क्षणाचाही विलंब न करता रोहा प्रांत अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, तहसीलदार किशोर देशमुख,तलाठी,ग्राम सेवक, माजी आमदार अनिकेतभाई तटकरे यांचे स्वीय सहाय्यक उमेश लोखंडे यांनी घटनास्थळी धाव घेत येथील ग्रामस्थांना धीर दिले तर तात्काळ नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश संबंधित अधिकारी यांना प्रांत अधिकारी यांनी देत रात्री उशिरा पर्यंत जीवनावश्य वस्तूंची मदत कार्यासाठी अधक प्रयत्न सुरू करत रातोरात वाडीवर राहणाऱ्या कुटुंबाची त्यांची घरांचे घरपट्टी वरील असेटमेंट ग्राम सेवक अधिकारी यांच्या कडून स्वतः प्रांत अधिकारी, तहसीलदार,त्यांचे कार्यालय कर्मचारी, तटकरे यांचे स्वीय सहाय्यक उमेश लोखंडे, स्थानिक सरपंच,सदस्य, ग्रामस्थ यांनी ग्राम पंचायत कार्यालयात बसून एकूण आढावा घेऊन पुढील त्यांना न्याय मिळावा या मदतीसाठी प्रयत्नशिल असल्याचे दिसून आले.

हातावर मोल मजुरी दूध दही तसेच दुग्ध व्यवसाय करत पोट भरणारे येथील वाडीवरील ग्रामस्थ डोंगर माथ्यावर वरती पुरेसा पाणी नसल्याने उन्हाळी दिवसास त्यांचे उदार निर्वाह करण्यासाठी डोंगर माथ्यावर न राहता ते डोंगर पायथ्याशी तसेच जिथे मिळेल तिथे आपली ढोरे गुरे घेऊन कुटुंबासहीत निर्वाळा घेतात तर चार पाच घरातील राहणारे कुटुंब हे मोल मजुरी साठी बाहेर असल्याने थोडक्यात बचावल्याचे समजते मात्र डोंगरात दिवसेंदिवस वणवा लागण्याच्या प्रमाणात भयानक वाढ झाली असून यावर वन विभाग काय उपाय योजना करणार याकडे लक्ष लागले आहे .मात्र वनव्यात वनसंपदेचे होणाऱ्या हानीला जबाबदार कोण यावर आता प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

खराब रस्ता दगड गोटे मातीचा कच्चा रस्ता त्यातून बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले, त्या पाठपाठ प्रांत अधिकारी देखील काही प्रवास वाहनातून आणि काही प्रवास पायी करत रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी धाव घेत पोहचले येथील ग्रामस्थांची भेट घेत पाहणी करून त्यांना धीर दिले तर वनविभागाचा हलगर्जी पणाने अखेर येथील पन्नास कुटुंब झाली बेघर त्यांच्यावर आली उपास मारीची वेळ डोंगर दऱ्या खोऱ्यात राहत असल्याने त्यांना आपत्कालीन वनव्यावर उपाययोजना करणाऱ्या साधना साहित्यांचे वाटप केलेले साहित्य देखील त्यांच्याकडून माघारी घेतल्याचे समजते यावर देखील आता मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे.तर या परिसरात मागील चार पाच दिवस वनवा लागत असल्याचे वनखात्याच्या निदर्शनात असून देखील त्याकडे काना डोळा केल्याने हे भले मोठे संकट या ग्रामस्थांवर ओढवले असल्याचे दिसून येत आहे. तर भयानक लागलेल्या वनव्याने रुद्ररूप धारण करून ग्रामस्थांची घरे जळून खाक झाली मात्र त्यांना शासनाकडून पुन्हा त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी मदतीची मागणी केली जात आहे.

Comments

Popular posts from this blog