वणव्याच्या भडक्यामुळे गोवे येथील बगायतदारांचे आंबा, काजु जळून खाक,हातातोंडांशी आलेला घास क्षणात उध्वस्त,शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
रोहा तालुक्यातील घटना!
कोलाड (विश्वास निकम ) रोहा तालुक्यातील गोवे येथील बागायतदार शेतकऱ्यांचे वणव्याच्या भडक्यामुळे आंबा, काजु, यांची कलमे जळून खाक झाली असुन या वणव्याच्या भडक्यामुळे येथील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडांशी आलेला घास क्षणात हिरावून नेला आहे.
बुधवार दि.५ मार्च रोजी दुपारच्या सुमारास अचानक वणवा पेटला आणि काही क्षणात वणव्याने रौद्ररूप धारण केले.बघता बघता सर्व बागेत वणवा पसरला आणि या वणव्यात आंबा,काजु,चिकु,फणस यांचे झाडे भस्मसात झाली आहेत.यामुळे आंब्याला बाजलेल्या कैऱ्या सुकून गेल्या तर काही कैऱ्या गळून पडल्या असल्यामुळे येथील शेताकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.लागलेल्या आगीचे कारण समजू शकले नाही.
या वणव्यामुळे गोवे येथील शेतकरी नंदा शिवराम वाफिळकर यांचे १० ते १२ आंबा व काजु यांची कलमाची झाडे तसेच निलेश चंद्रकांत वाफिळकर यांची १२ आंबे व काजु यांची झाडे तसेच चिकु व फणस यांची एकूण २५ ते ३० झाडे जळून खाक झाली आहेत.यामुळे येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असुन संबंधित अधिकारी यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बागेची पाहणी करून नुकसान मिळावी अशी मागणी बागायतदारांकडून करण्यात आहे.
दहा ते बारा वर्षे फळ झाडांना खते व पाणी घालून शेतकरी मोठया कष्टाने वाढवतो.या पिकांच्या जोरावर शेतकरी असंख्य आराखडे बांधत असतो.परंतु वणव्यामुळे एका क्षणात हातातोंडांशी आलेल्या घास त्वरित हिरावून गेल्यानंतर शेतकऱ्यांच्या स्वप्नाचे होत्याचे नव्हते होते.घर एका वर्षात उभे करता येते परंतु मोठी मेहनत करून पुन्हा पिक घेण्यासाठी दहा बारा वर्षे पुन्हा वाट पाहावी लागते.
Comments
Post a Comment