श्री गणेश गोवे आयोजित क्रिकेट सामन्यात जय भवानी चिंचवली संघ अंतिम विजेता
कोलाड (विश्वास निकम ) गोवे येथील महिसदरा नदी तिरावरील निसर्गरम्य ठिकाणी रविवार दि.२ मार्च २०२५ रोजी गोवे खांब ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पर्व ५ यांच्या मान्यतेने श्री गणेश गोवे यांच्या तर्फे क्रिकेट सामान्यांचे आयोजन करण्यात आले या क्रिकेट सामन्यात जय भवानी चिंचवली संघ अंतिम विजेता संघ ठरला.
या स्पर्धेचे उद्धघाटन विभागीय अध्यक्ष नरेंद्र जाधव,विभागीय अध्यक्षा सुप्रिया जाधव,माजी उपसरपंच संदिप जाधव, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष पांडुरंग जाधव, तसेच गोवे खांब ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र जाधव, उपाध्यक्ष नितेश मुंडे,सेक्रेटरी शरद वारकर,उपसेक्रेटरी शिरीष दळवी, खजिनदार अंकेत खैरे उपखजिनदार रोशन पवार,श्री गणेश गोवे संघाचे पदाधिकारी व सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले.
या क्रिकेटच्या अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात जय भवानी चिंचवली संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी संघ ठरला,तर श्री सोमजाई कोलाड संघाला द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले,तर सोनारसिद्ध धाटाव तृतीय,तसेच श्री गणेश गोवे चतुर्थ क्रमांकाचे मानकरी संघ ठरले सर्व विजेता संघास माजी उपसरपंच संदीप जाधव, पांडुरंग जाधव,लिलाधर दहिंबेकर,रामचंद्र कापसे,सुनिल दहिंबेकर,दिलीप आंबेकर,गोविंद गायकवाड,अरुण दहिंबेकर,अशोक पवार,सुदाम जाधव,धनेश घरट,यांच्या शुभेहस्ते रोख रक्कम व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले,तसेच मालिकावीर व सामनावीर सूर्यकांत येरुणकर,उत्कृष्ट फलंदाज अजय मोरे, तसेच उत्कृष्ट गोलंदाज ललित पवार, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण सिद्धेश जाधव यांना आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.
सर्व क्रिकेट सामने यशस्वी करण्यासाठी श्री गणेश गोवे संघाचे शरद वारकर,निखिल दहिंबेकर, निलेश दहिंबेकर,पिंट्या पवार अजित दहिंबेकर,विनय दहिंबेकर, सार्थक दहिंबेकर,प्रशांत गुजर,हरिचंद्र गुजर,सत्कार कापसे,अविनाश दहिंबेकर,आकाश दहिंबेकर,साहील पवार, साहील दहिंबेकर,यश वारकर,जयसिंग पवार, सहेंद्र पवार,तसेच सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच विजय गुजर,वैभव जाधव, गोवे खांब ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य यांनी मेहनत घेतली.
Comments
Post a Comment