इंडुरन्स वर्ल्ड आयोजित, इंडुरन्स नॅशनल चॅम्पियनशीपमध्ये कल्याणच्या विद्यामंदिर टिटवाळाच्या कुमारी दक्षतनया गाडर विद्यार्थिनीने पटकावले ब्रॉन्झ मेडल्स!

 सर्वत्र अभिनंदनचा वर्षाव!

कल्याण (प्रतिनिधी)इंडूरन्स वर्ल्ड आयोजित - इंडुरन्सनॅशनल चॅम्पियनशीप - 2023-24 मध्ये प्रोफेशनल स्पीड इनलाईन स्केटिंगच्या क्रीडास्पर्धा महाराष्ट्रातील खोपोली येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेत छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संचलित  विद्यामंदिर - टिटवाळाच्या कु.दक्षतनया रामदास गाडर या विद्यार्थिनीने 14 वर्षे वयोगटात महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व करताना  2 ब्रॉन्झ मेडल्स पटकावून राष्ट्रीयपातळीवर महाराष्ट्राचे नाव उंचावलेले आहे. पुढे ती श्रीलंका येथे होणाऱ्या  इंडुरन्स इंटरनॅशनल चॅम्पियनशीप - 2023-24 मध्ये 14 वर्षे वयोगटात भारत देशाचे प्रतिनिधीत्व करणार आहे.

         छत्रपती शिक्षण मंडळ -  कल्याण संचलित, विद्यामंदिर - टिटवाळाची ही विद्यार्थिनी  स्केटिंग सारख्या धाडसी  व जोखमीच्या क्रीडाप्रकारात आंतरराष्ट्रीय  स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करणार असल्यामुळे शाळेस विशेष आनंद होत आहे. स्केटिंग खेळातील या यशाबद्दल तिचे शाळेतील विद्यार्थी,शिक्षक आणि पालक अभिनंदन करून इंटरनॅशनल लेव्हल करिता शुभेच्छा देत आहेत.

  सदर विद्यार्थिनीला  शाळेचे मुख्याध्यापक श्री. अरुण आवटे सर,वर्गशिक्षिका - सौ.स्वाती पवार मॅडम, श्री.खडके सर, श्री.ठाकरे सर, श्री.आकाश झाल्टे सर यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

Comments

Popular posts from this blog