तळा पूसाटी, जोगवाडीला स्थलांतरिताच्या नोटीसा!
सुरक्षित स्थळी जाण्यासाठी प्रशासनाच्या सूचना!
तळा (कृष्णा भोसले) तळा पुसाटी, जोगवाडीला दरडग्रस्त धोका असल्याने जिल्हा प्रशासनाने अलर्ट जारी केल्याने या गावात दि.20 जुलै रोजी तहसीलदार तळा, गटविकास अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी माणगाव,वरिष्ठ पोलिस निरीक्षक तळा,विस्तार अधिकारी,मंडळ अधिकारी,तलाठी तळा, मुख्याधिकारी नगरपंचायत तळा नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष,नगरसेवक नगरपंचायत,यांनी मौजे तळा येथील पूसाटी व जोगवाडी या संभाव्य दरड ग्रस्त गावात उपस्थित राहून सर्व नागरिकांना/ग्रामस्थांना सूचना दिल्या.
तसेच राधाकृष्ण मंदिर वरचा हॉल,कुणबी समाज सभागृह,चंडिका मंदिर सभागृह,गो.म.वेदक कॉलेज,गणेश मंगल कार्यालय हॉल येथे स्थलांतरीत होनेचे आदेश व आवाहन केले.ग्रामस्थांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद देऊन स्थलांतर होणेचे कबूल केलेआहे अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
Comments
Post a Comment