तळवली तर्फे अष्टमी ग्राम पंचायतीच्या प्रभारी सरपंचपदी सौ.मानसी लोखंडे यांची नियुक्ती,
सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव!
कोलाड (श्याम लोखंडे ) रोहा तालुक्यातील मौजे तळवली तर्फे अष्टमी ग्राम पंचायतीच्या प्रभारी सरपंचपदी विद्यमान उपसरपंच सौ मानसी मंगेश लोखंडे यांची 31 मे रोजी शासकीय नियमानुसार नियुक्ती करण्यात आली व पदभार स्वीकारले .
सदर या ग्राम पंचायत येथील थेट सरपंच सौ रुपाली रघुनाथ कोस्तेकर यांनी ग्राम पंचायत मध्ये केलेल्या अपहार व गैर व्यवहार प्रकरणी येथील सदस्यांनी त्यांच्या विरोधात तक्रारी अर्ज दाखल केले गेले होते आणि त्या चौकशी आवहालात चौकशीत कोकण विभागीय आयुक्त यांच्या सुनावणीत सौ रुपाली कोस्तेकर यांचे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (1959 चा मुंबई अधिनियम क्रमांक 3 ) कलम 39 (1)नुसार सरपंचपद व सदस्यपद रद्द करण्यात आल्याने त्या जागेवर महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत अधिनियम कायदा अंतर्गत याठिकाणी विद्यमान उपसरपंच सौ मानसी लोखंडे यांनी तो प्रभारी सरपंचपद स्वीकारले आहे .
यावेळी ग्राम विकास अधिकारी सौ पिंपळकर,ग्राम पंचायत सदस्य सौ रिया लोखंडे,सरोजनी मरवडे,रणिता मरवडे ,दशरथ जाधव ,ग्राम पंचायत कर्मचारी सुभाष बामणे,माजी सरपंच व जेष्ट नेते वसंतराव मरवडे,धनाजी लोखंडे,रामभाऊ मरवडे,शेकापचे खांब विभागीय नेते मारुती खांडेकर सर ,सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र बामणे,शंकर नाना मरवडे,नामदेव मरवडे,राम मरवडे,चिल्हे पोलीस पाटील गणेश महाडिक, मंगेश लोखंडे,रविंद्र लोखंडे, भाऊ लोखंडे,एकनाथ लोखंडे,नंदकुमार रामचंद्र मरवडे,सौ पूजा लोखंडे,चंदना लोखंडे,जयवंती महाडिक ,भारती शिंदे,आदी चिल्हे व तळवली ग्रामस्थ व महिला मंडळ उपस्थित होते.
यावेळी प्रभारी सरपंच पदी नियुक्ती झालेल्या सरपंच सौ मानसी लोखंडे यांना ग्राम विकास अधिकारी सौ पिंपळकर यांनी नियुक्ती पत्र देत त्यांचे स्वागत केले तसेच येथील प्रभाग क्रमांक दोन मध्ये रिक्त झालेल्या सदस्य पद जागेवर दिनांक 25 मे रोजी झालेल्या निवडणुकीत सौ रणिता राजेंद्र मरवडे ह्या बिनविरोध निवडून आल्याने नवनिर्वाचित सदस्य यांचे देखील यावेळी त्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच सर्व सदस्य,चिल्हे व तळवली ग्रामस्थ महिलांनी त्यांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment