लायन्सक्लब ऑफ कोलाड रोहाच्या मोफत नेत्र तपासणीला उत्स्फूर्त प्रतिसाद

16 रुग्णांवर होणार मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया

खांब (नंदकुमार कळमकर ) लायन्सक्लब ऑफ कोलाड रोहा, लायन्स हेल्थ फाऊंडेशन अलिबाग , समता फाऊंडेशन मुबंई,व निलिकॉन फूड्स डाइज लिमिटेड धाटाव रोहा यांच्या संयुक्त विद्यमाने व लायन्सक्लबचे मार्गदर्शक लायन रविंद्र घरत यांच्या विशेष मार्गदर्शनातून ग्रुप ग्राम पंचायत ऐनवहाल व ग्रामस्थ महिला मंडळ यांच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया या शिबिराचे आयोजन डोलवहाळ येथे करण्यात आले होते .

अंत्यत दुर्गम आणि ग्रामीण भागात आयोजित केलेल्या शिबिराला येथील रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतीसाद लाभला यात बहुसंखे रुग्णांची मोफत तपासणी व प्राथमिक उपचार करण्यात आले तर 16 गरजू रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे तर सहा रुग्णांची अल्प दरात पडद्यावरील जाळ क्लिनिक केलं जाणार आहे . यावेळी लायन्सक्लबचे उपाध्यक्ष नरेश बिरगावले ,कोलाड लायन्सक्लब चे सचिव रविंद्र लोखंडे, खजिनदार डॉ श्याम लोखंडे,अलंकार खांडेकर, डॉ मंगेश सानप,ग्राम पंचायत सरपंच विश्वनाथ धामणसे ,माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य सुधीर बारस्कर,सौ प्रमिला मोरे,अनंत गोळे, खामकर, लायन्सक्लब चे उपाध्यक्ष लायन डॉ विनोद गांधी,डॉ मंगेश सानप,अनिल महाडिक, अलंकार खांडेकर,नंदकुमार कळमकर, विश्वास निकम,दिनकर सानप ,श्रुती ऑप्टिकलचे विठ्ठल सावळे,लायन सौ पूजा लोखंडे लायन हेल्थ फाऊंडेशन अलिबागचे डॉ शुभम जाधव,सायली केणी ,श्रद्धा म्हात्रे , कमलाकर,गांधी पॅथॉलॉजीक येथील कोलाड आंबेवाडी च्या टेक्निशियन नूतन सानप ,अश्विनी जांभळे,आदी ग्रामस्थ नागरिक तपासणीसाठी आलेले रुग्ण बहुसंख्येने यावेळी उपस्थीत होते .

लायन्सक्लब ऑफ कोलाड रोहा यांच्या वतीने मोफत आयोजित केलेल्या नेत्र तपासणीसाठी लायन्सक्लब कोलाड रोहा लायन्स हेल्थ फाउंडेशन अलिबाग  व निलिकॉन कंपनी यांच्या सौजन्याने गरजूंनवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे

          तर कोलाड रोहा लायन्सक्लब चे उपाध्यक्ष नरेश बिरगावले,डॉ श्याम लोखंडे,सरपंच विश्वनाथ धामणसे,यांचे यावेळी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले तसेच यावेळी खजिनदार लायन डॉ श्याम लोखंडे यांचा वाढदिवस ऐनवहाल ग्राम पंचायत व लायन मेंबर व उपस्थित नागरिकांसमावेत केक कापून करण्यात आले व लोखंडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेक्रेटरी लायन रविंद्र लोखंडे यांनी केले तर हे शिबीर यशस्वी करण्यासाठी लायन अलंकार खांडेकर,नंदू कळमकर, दिनकर सानप,विश्वास निकम,प्रसाद लोखंडे व ऐनवहाल ग्राम पंचायत सह मंडळातील पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले .

Comments

Popular posts from this blog