नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब संस्थेचा इयत्ता 12 वीचा निकाल शंभर टक्के कु.वैष्णवी पाराठे 70.33℅ गुण संपादित करत प्रथम 

कु.वैष्णवी संजीवकुमार पाराठे 

कोलाड (श्याम लोखंडे ) महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. बोर्डाकडून निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. राज्याचा निकाल एकूण 94.22 टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांना आपला निकाल हा दुपारी एक वाजल्यानंतर पाहता आला. 

रोहा तालुक्यातील नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब संचालित रा ग पोटफोडे (मास्तर) विद्यालयाचे कै द ग तटकरे उच्च माध्यमिक इयत्ता 12 वी चा निकाल नुकताच जाहीर झाला असून या विद्यालयाचा शंभर टक्के निकाल लागला आहे तर या विद्यालयात मुलींनी बाजी मारली आहे.

सदर च्या जाहीर झालेल्या निकालात मुलींची सरशी पाराठे वैष्णवी संजीवकुमार हिने 70.33% गुण संपादित करत प्रथम क्रमांक पटकावला तर गोठम पूजा सुरेश हिने 70.00% गुण प्राप्त करत द्वितीय क्रमांक पटकावला व बारस्कर प्रतीक्षा पांडुरंग हिने 69.17% गुण मिळवून तृतीय क्रमांक तसेच जाधव तनुजा जयवंत हिने 69.17% गुणांची बाजी मारत तृतीय क्रमांक पटकावला तसेच गोसावी दिक्षा जनार्दन हिने 65.17% गुण प्राप्त करत चतुर्थ क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत .

सालाहाबाद प्रमाणे या संस्थेचा यंदाचा बाराविचा निकाल शंभर टक्के जाहीर झाल्याने शाळेचे प्राचार्य सुरेश जंगम तसेच संस्थेच्या वतीने सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव सर्व स्तरांतून होत आहे.

आपण दिलेल्या परीक्षेचा निकाल कधी लागणार याचीच उत्सुकता साऱ्या विद्यार्थी वर्गाला लागली होती तसेच याबाबत जवळपास 15 लाख विद्यार्थ्यांना आणि पालकांना उत्सुकता होती, ही उत्सुकता संपली. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थी हा निकाल पाहू देखील शकले. राज्याचा बारावीचा निकाल 94.22 टक्के लागला आहे, जो गेल्यावर्षीच्या तुलनेत 5.31 टक्क्यांनी कमी झाला आहे. मागील वर्षी हा निकाल 99.53 टक्के लागला होता. 24 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे तर कोकण विभाग पुन्हा टॉपवर आला आहे.

Comments

Popular posts from this blog