कोणताही माणूस रूपाच्या गुणांच्या वर्णनात तल्लीन झाला कि त्याला स्वतःच्या स्थितीचा विसर पडतो:-ह.भ.प.अशोक महाराज जाधव
गोवे-कोलाड (विश्वास निकम ) एक गौळण हरिच्या लावण्य रुपाला भुलली. बाजारात दुध विकायला गेली असता दुध घ्या दुध असे म्हणन्या एवजी हरि घ्या हरि असे म्हणु लागली.हरीचे रूप तिने डोळ्याने पाहिले तिच्या ध्यानी मनी तेच ठसले होते. म्हणूनच ती हरि घ्या हरि असे म्हणु लागली होती कारण त्या गौळणीला स्वतःच्या स्थितीचा विसर पडला आणि गोविंदाच्या रूपात गुणांच्या वर्णनात तल्लीन झाली होती. बाजारातील अभक्त तिला बघून हसत होते.पण तीचे कान त्यांच्याकडे नव्हते.असे मत ह.भ.प. अशोक महाराज जाधव (हिंजवडी, पुणे )यांनी कोलाड विभाग वारकरी संप्रदायाच्या आयोजित काल्याच्या किर्तन सेवेत कोणी ऐकी भुलली नारी l विकीता गोरस म्हणे घ्या हरि ll१ll देखिला डोळा बैसला मनी तो वंदनी उच्चारी ll ध्रु ll आपुलिया विसर भोळा l गोविंद कला कौतुके ll२ll तुका म्हणे हांसे जन l नाही कान ते ठायी ll३ll या जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या अभंगाच्या आधारे व्यक्त केले.
यावेळी आ.अनिकेत तटकरे, राकेश शिंदे युवा कार्यकर्ते, प्रितम पाटील रोहा तालुका रा.कॉ.महिला अध्यक्षा,जगन्नाथ धनावडे उपसरपंच आंबेवाडी,सुशील शिंदे,संजय मांडळुस्कर, निशिकांत पाटील, ह.भ.प.मारुती महाराज कोल्हाटकर,पुरुषोत्तम महाराज पाटील, शेळके महाराज,दहिंबेकर महाराज,तेलंगे महाराज,बबन महाराज वांजले,गायनाचार्य रविंद्र मरवडे,देवजी मरवडे,दळवी महाराज, मुख्याध्यापक शिरीष येरुणकर सर उपस्थित होते.
सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोलाड विभाग वारकरी संप्रदायाचे कार्यवाहक अध्यक्ष ह.भ.प. अनिल सानप,उपाध्यक्ष अक्षय ओव्हाळ,सेक्रेटरी सुभाष देशमुख, खजिनदार विठोबा ढोकरे, अनिल महाबळे, अजय तेलंगे, राजेंद्र पंदेरीकर, चंद्रकांत बाईत, अनंत लहाने, गणेश जाधव, अशोक राजीवले, राजेंद्र म्हसकर,कोलाड विभाग कमिटी अध्यक्ष सुनिल भऊर, उपाध्यक्ष अनंत सानप, सेक्रेटरी सचिन तेलंगे,खजिनदार गणपत गोरीवले व कोलाड विभाग वारकरी संप्रदायाचे सर्व सदस्य यांनी अधिक मेहनत घेतली.
Comments
Post a Comment