अपंगावर मात करून फुलवीला संसार! अपंगांच्या जिद्दीला सलाम!
कोलाड नाका (शरद जाधव)जिवन एक संघर्ष आहे, परंतु जगन्याची प्रबळ इच्छा असेल तर मार्ग सापडतो. दोन अपंगांच्या जिद्दीची कहाणी, दोनी वधू वर हे पुर्णत पायाने अपंग असुन सुधा त्यानी लग्न बंधनात अडकन्याचा निर्णय घेतला .व सदर विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. या विवाह सोहळ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. तर या उभयतांच्या जिद्दीला सलाम असे बोलले जात आहे .
माणगांव तालुक्यातील इंदापुर वाढवण येथील बबन शेलार यांची मुलगी निशा पायाने पूर्णता अपंग होती .त्यामूळे आई वडीलानी लहान पनापासुन तीचे पालन पोषण केले.आपली मुलगी अपंग असल्याने तिचे लग्न कसे होणार या चिंतेत ते होते. मात्र परमेश्वरी शक्ती कुठे तरी आहे. व या लग्न बंधाच्या गाठी बांधलेल्या असतात याचा प्रत्यय शेलार कुटुंबियाना आला. सतारा जिल्ह्यातिल खुजगांव ता. शिराळा, येथील गुंडा सावंत यांचा पायाने पूर्णता अपंग असलेला सुपुत्र संभाजी यानी निशाला मागणी घातली व दोघांनी एकमेकाला होकार देत लग्न जुळले. माणगाव येथील खरे मंगळकार्यालयात मोठ्या थाटामाठात या दोन उभयतांचे लग्न पार पडले. या नववधूना शुभआशिर्वाद देण्याकरिता नातेवाईक मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्तीत होते .
हा विवाह सोहळा पार पडल्यानंतर या नवदांपत्यानी दिलेली प्रतिक्रीया बोलकी ठरली. ते म्हणाले की आम्ही पायानी जरी अंपग असलो तरी आम्हाला देवाने चांगले दोन हात दिले आहेत .त्या हाताने सहजीवनाची सुरवात करु. तुम्हा सर्वांच्या आशिर्वादातून आमचा संसार यशस्वी करु असे ते म्हणाले.
देवाने प्रतेकाला जन्म दिला आहे. जगण्याचा अधिकार दिला आहे. आज समाजामध्ये असे असंख्य अपंग आहेत. त्यांच्या जीवनात आनंद कसा निर्मान होईल त्यांचा संसार कसा फुलेल असा प्रयत्न विविध सामजिक संघटनेनी करावा.असे मत पांडूरंग सरफळे (रावसाहेब) यानी केले.
Comments
Post a Comment