कोलाड पोलीस पाटील सन्मान चषक २०२२ सावरवाडी येथील भव्य मैदानात संपन्न. जिल्हा अध्यक्ष संतोष दळवी यांचे तीन वर्षापूर्वीचे स्वप्न झाले साकार!

सुतारवाडी :- ( हरिश्चंद्र महाडिक)महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघ शाखा कोलाड (रोहा) सन्मानाचा चषक २०२२ सावरवाडी (ता. रोहा) येथील भव्य मैदानात संपन्न झाला. या भव्य आणि देखण्या कार्यक्रमास आमदार अनिकेत भाई तटकरे, श्री. रामचंद्र चितळकर, रायगड जिल्हा अध्यक्ष श्री. संतोष दळवी, रायगड जिल्हा सचिव श्री. विकास पाटील, जिल्हा खजिनदार श्री. रामचंद्र देशमुख, येरळ ग्रामपंचायत सरपंच सौ. विमल दळवी, कुडली सरपंच सौ. अश्विनी कामथेकर,  श्री. राकेश शिंदे, श्री. महेंद्र पोटफोडे, श्री दर्शन तेलंगे, श्री. मनोहर साळवी, श्री. बाळाराम सरफळे, श्री. संदिप कडू, युट्युबचे श्री. सचिन साळवी, श्री. संजय मांडलुसकर श्री. दत्ता जाधव, राज्य सचिव श्री. कमलाकर मांगले,

जिल्हा खजिनदार श्री. विन्हरेकर, महाड तालुका अध्यक्ष संजय सकपाळ, त्याचप्रमाणे महाड विभागातील, रोहा विभागातील अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी, तसेच सुतारवाडी, कोलाड विभागातील सरपंच, स्वयंभू क्रिकेट असोसिएशन चे सर्वपदाधिकारी उपस्थित होते.

                 सदरील चषकाची कल्पना गेल्या तीन वर्षापासून माझी होती. हे माझे स्वप्न महाराष्ट्र कामगार दिनी पूर्ण झाल्याचे रायगड जिल्हा पोलीस पाटील संघाचे जिल्हा अध्यक्ष  श्री. संतोष दौलत दळवी यांनी सांगितले. परिपूर्ण नियोजन आणि घेतलेली मेहनत यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाल्याचे जाणकरांनी सांगितले. या चषकासाठी १६ संघांनी सहभाग घेतला होता. प्रथम क्र. कुडली, द्वितीय क्र. जामगाव, तृतीय क्र. सुतारवाडी, चतुर्थ क्र. अंबिवली आदींना मिळाला. सामन्याचे समालोचन योगेश जाधन यांनी केले.


Comments

Popular posts from this blog