रोहा तालुक्यातील दोन घरे जळून भस्मसात, तामसोली गावातील घटना!

 लाखो रुपयांचे नुकसान!

  गोवे-कोलाड (विश्वास निकम )रोहा तालुक्यातील तामसोली गावात लागलेल्या आगीत दोन घरे जळून खाक झाली असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे सुदैवाने जीवित हानी झाली नाही. मात्र अगीचे कारण समजु शकले नाही.    


  शनिवार दि.१४ मे २०२२ रोजी रात्री ८.३० च्या सुमारास तामसोली येथील रहिवासी दशरथ गजानन अचानक आग लागली असता ऐनघर  ग्रामपंचायत सदस्य यांच्या लक्षात येताच याची माहिती पोलिस पाटील महेश शिरसे यांना दिली. परंतु काही क्षणात या अगीने रुद्र रूप धारण करीत बाजूला असलेल्या नारायण गायकवाड यांच्या घराला ही आग लागली दोन्ही कुटुंब कामानिमित्त बाहेर होते परंतु एक कुटुंब शेजारी असलेल्या लग्नासाठी आले होते तर दुसऱ्या घराला लॉक होते. एक कुटुंब लग्नाच्या घरी गेले होते.त्यामुळे जीवित हानी टळळी तसेच शेजारी असलेल्या शिवराम चव्हाण यांच्या घराचे ही नुकसान झाले आहे.


 आग लागताच समजताच तामसोली गावातील ग्रामस्थांनी व तरुणांनी पाणी ओतून आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु आग आटोक्यात न आल्यामुळे जिंदाल कंपनीच्या अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना पचारण करून आग आटोक्यात आणली. तो पर्यंत या घरांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.

Comments

Popular posts from this blog