माझ्या लाल मातीतला खेळाडू हा माझ्या देशातल्या संघात खेळला पाहिजे:-माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते

  गोवे-कोलाड (विश्वास निकम ) मराठी माणसाने नेहमी आक्रमक राहिले पाहिजे.कबड्डी हा खेळ जिवंत ठेवायचे असेल तर जिव ओतून खेळा, जिव झोकून देऊन खेळा तरच माझ्या लाल मातीतला खेळाडू माझ्या देशाच्या संघात खेळेल असे मत माजी केंद्रीय अनंत गिते यांनी आंबेवाडी जिल्हापरिषद मतदार संघातील भगवा चषक कबड्डी स्पर्धेच्या उदघाट्न प्रसंगी व्यक्त केले.

                   ते पुढे म्हणाले कि या खेळामुळे नोकरीचा प्रश्न सोडविल. हा खेळ मातीतला असून हळू हळू या खेळाला शेलिब्रेटी उपस्थित राहिले जात आहेत.यामुळे हा खेळ आशिया स्थरासह अनेक देश खेळू लागले आहेत यामुळे हा खेळ ऑलिपिक मध्ये ही खेळला जाईल असे चित्र उभे राहिले आहे.परंतु हा खेळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेल्या नंतर तो राष्ट्रीय संघात राहतो कि काय? अशी परिस्थिती निर्माण आहे आता हरियाणा, पंजाब,कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू या सर्व राज्यातील खेळाडू या संघात येऊ लागले असून यामुळे महाराष्ट्रातील कबड्डी खेळात खेळाडू मागे पडत आहेत.आपण त्या  इरशेने खेळले पाहिजे यामुळे खेळात पहिल्या आशियन चॅनपियनशिप मध्ये सुवर्ण पदक मिळवले होते व त्यांचे कर्णधार कोकणातील अशोक शिंदे होते. मी चंद्रकांत लोखंडे आणि त्यांची टीम यांना धन्यवाद देईल त्यांनी आयोजित केलेल्या अशा स्पर्धेतून खेळाडू निर्माण होत असतात.

            यावेळी आ. रविशेठ पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले कि खरे म्हणजे कबड्डी हा खेळ लोकप्रिय खेळ आहे. अशा प्रकारे कबड्डीचे आयोजन करून हे खेळाडू जिल्ह्यातून राज्यात, राज्यातून देशात असे निवडले जाऊ शकतात. यावेळी माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते,आ.रविशेठ पाटील,आ. भरतशेठ गोगावले,आ.महेंद्र दळवी, अमित घाग,अनिल नवगणे रायगड जिल्हा प्रमुख,रमेश सुतार, रोहा तालुका प्रमुख समिर शेडगे, उप तालुका प्रमुख चंद्रकांत लोखंडे, राजेंद्र राऊत, अमरजी तेलंगे, कुलदीप सुतार, ज्ञानेश्वर खांमकर, मिलिंद पवार जेष्ठ नेते शंकरराव म्हसकर, शिवराम महाबळे, सरपंच समिर महाबळे, विष्णु मोरे,चेतना ताई लोखंडे ,मनोहर महाबळे,ज्ञानेश्वर सुतार,अजय बाकाडे, गणेश शिंदे,आबा शिंदे,रमेश सानप, बबन म्हसकर, खांडेकर सर शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog