कोलाड विभाग वारकरी संप्रदाय यांचा अखंड नामयज्ञ सोहळा!

   गोवे- कोलाड (विश्वास निकम ) कोलाड विभाग वारकरी संप्रदाय यांच्या अखंड नामयज्ञ सोहळा वैशाख शुद्ध त्रयोदशी शनिवार दि.१४ मे २०२२ ते वैशाख शुद्ध चतुर्थदशी रविवार दि.१५ मे २०२२ पर्यंत द. ग.तटकरे माध्यमिक विद्यालय कोलाड हायस्कूल कोलाड ता. रोहा जि. रायगड येथे आयोजित करण्यात येणार आहे.

      शनिवार दि.१४ मे २०२२ रोजी दुपारी १२ते २ वा महाप्रसाद ह. भ. प.रविंद्र भिकाजी पानसरे( तळवळी) यांच्या सौजन्याने,सायंकाळी ६.४५ ते ९ वाजता ह.भ.प संजय महाराज वेळूकर (सातारा ) यांची किर्तन सेवा,कै.बंडू जानू सागवेकर यांच्या स्मरणार्थ रवींद्र बंडू सागवेकर सरपंच कोलाड यांच्या सौजन्याने,रात्री ९ ते ११महाप्रसाद, रविवार दि.१५ मे २०२२ रोजी सकाळी १० ते १२वा.ह.भ.प.अशोक महाराज जाधव (पुणे )यांचे काल्याचे किर्तन सौ. प्रितम पाटील रोहा तालुका महिला अध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सौजन्याने,दुपारी १२ नंतर महाप्रसाद दत्तमंदिर (चिंचवली ) यांच्या सौजन्याने होणार आहे असून विशेष सहकार्य रोहा तालुका वारकरी संप्रदाय सर्व पंचक्रोशीतील वारकरी यांचे लाभणार असून सर्व कार्यक्रम यशस्विकरण्यासाठी कोलाड विभाग वारकरी संप्रदायाचे सर्व पदाधिकारी व सर्व सदस्य अधिक मेहनत घेत आहेत.

Comments

Popular posts from this blog