कोलाडात शेतकरी दादाची भातशेतीची लगबग उरात पावसाची धडकी मात्र कायम!

    कोलाड नाका (शरद जाधव)कोलाड विभागात भात शेतीची पिके बहरली असुन, कापणी ची कामे अंतीम टप्प्यात आहेत,शेतकरी दादाची शेतीची कामे उरकन्याची लगबघ सुरु आहे. तरी मात्र पाऊस पडून हाता, तोंडाला आलेले घास जाईल की काय अशी धडकी शेतकरी वर्गाच्या उरात मात्र बसली आहे.

          कोलाड खांब विभागात कालव्याला उन्हाळी पाणी सोडत नाहीत त्यामूळे शेतीक्षेत्र कमी झाले आहे, ज्यांची घरची चार माणसे आहेत  व जे शेतकरी कायम शेतीवर अवलंबून आहेत अशी माणसे शेती करित आहेत कारण मजुरी देखील खुप वाढलेली आहे.सध्या बाजारात नवनवीन विकसित बियाणे येत असल्याने शेतीमधे उत्पादन देखील चांगले मिळत आहे. अणि हमी भाव केंद्रामुळे खाजगी भातव्यापारी वर्गाकडून शेतकरी यांची लुट थांबली आहे. 

 रोहा तालुका हा भाताचा कोठार होता. मात्र पाठबंधारे खात्याच्या हलगर्जीपणा मुळे म्हणा, किंवा शेतकरी वर्गाच्या मानसिकतेमुळे म्हणा पुर्वीचा भाताचा कोठार आत्ता रिता  झालेला दिसत आहे.  पिकत नाही ना मंग विकुन टाकू असे म्हणत बहूसंख्य जमिनी कवडीमोल भावाने विकल्या गेल्या आहेत.आणि आज जमिनीचे भाव गगनाला भिडलेचे चित्र दिसत आहेत. 

              सध्या नवनविन साधने विकसित झाल्या मुळे शेतीला पुन्हा एकदा महत्व प्राप्त झाले आहे. शासकीय अधिकारी वर्गाचे सुधा वेळोवेळी मार्गदर्शन मिळत आहे. भात पिकाबरोबर भाजी लागवड, कलिंगड, हळद अशी विविध पिके सुधा घेतली जात आहेत. अणि उत्पादन यशस्वी होत आहेत  वाशी येथील एका प्रगतशील शेतकरी यानी 20 एकर ला 83 लाखाचे कलिंगडाचे पिक घेतले असे समजले काय खरे ,काय खोटे अंदाज नाही, मात्र हे खरे असेल तर शेतीमधे सोने पिकते हे मात्र खरे. 

       शेतीमध्ये तरुण देखील शिरकाव करतोय हे चित्र रोह्यत दिसत आहे. कोलाड खांब विभागात शेतकरीदादाची भात कापणीकरिता लगबग सुरु असुन पाऊस पडेल की काय याची चिंता शेतकरी वर्गाला लागली आहे .

         यावेळी अधिक माहिती देताना प्रगतशील शेतकरी श्री. बाळ सरफळे यानी सांगितले की शेती परवडत नाही या मानसिकतेतून शेतकरी बाहेर पडायला तयार नाही. आपल्या आई वडीलानी  याच शेतीमधुनआपल्याला शिकवले मोठे केलेच ना, आज अधूनिकतेची कास धरुन शेती करा शेतिमध्ये सोने पिकेल असा विश्वास सरफळेवाडी येथील  बाळ सरफळे यानी वेक्त केला.           

Comments

Popular posts from this blog