उद्या कोलाडातील विविध लग्न सोहळ्यास खासदार सुनिल तटकरे आवर्जून उपस्थित राहणार!
कोलाड नाका एप्रिल (शरद जाधव) सध्या सर्वत्र लग्न सोहळ्याची धुमशान सुरु आहे. एकाच दिवशी अनेक मुहर्त त्यामूळे व्हराडी मंडळीची धावपळ. त्यातच साहेब आमच्या लग्नाला आलच पाहीजे.यजमानाचा आग्रह आणि कुटुंबात आनंद देणारा वा विवाह सोहळ्याचा क्षण त्यामूळे गेलेच पाहीजे. म्हणत खासदार सुनिल तटकरे कोलाड, सुतारवाडी ,परिसरातील विविध ठिकाणच्या लग्न सोहळ्याला उपस्थित राहुन वधू वराना शुभआशिर्वाद देणार आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणात असताना सुनीलजी तटकरे खुप व्यस्त असत, कारण मतदार संघाबरोबरच पक्षाच्या महत्वपुर्ण जबाबदारी सुधा त्याना पारपाडव्या लागत असत. परंतु "खासदार झाले की माणसाला जरा उसंती मिळते "असे कोणी जरी म्हणत असेल तरी सुनिल तटकरेंना हे वाक्य लागु पडत नाही. कारण सुतारवाडीत कार्यकर्ते यांचा फुललेला दरबार पहाता हे खासदार याही वयात राजकिय महत्वकांक्षा ठेउन अधिकची जबाबदारी पार पाडताना दिसत आहेत.
सुनिल तटकरे यानी योग्य वेळी मुलाना राजकारणात पुढे आनले. अणि हेच काम जिल्ह्यतील अनेक नेत्याना जमले नाही.त्यामुळे ताई,भाई ची साथ साहेबांना मोलाची ठरत आहे .अदिती ताई मंत्री असल्यांने त्यांचे राजकारण जरा हटके आहे .कारण त्या मंत्री आहेत त्यांच्यावर खुप मोठी जबाबदारी आहे. मात्र अंगी विनम्रपणा व बोलण्यातील कौशल्य यामुळे राजकारण लवकर शिकल्या आहेत. तर कार्यकर्ते यानी बोलवायचे, अणि अनिकेत भाई नी जायचे हा परिपाठच रोहा तालुक्यात पडला आहे. कुठला कार्यकमाला बोलवले अणि ते गेले नाहित असे कधीच झाले नाही . त्यामूळे सर्वसामान्यामध्ये सहज समरस होणारा नेता अशी बिरुदावली त्यानी अल्पावधीतच कमावली आहे.
सध्या रायगड जिल्हा अणि विकास हे समीकरण सुरु आहे. बारामती करांच हात पाठीवर असल्याने जास्तीत जास्त निधी रायगड साठी कसा मिळेले या करिता खासदार व्यस्त आहेत. तरी देखील कार्यकर्ते यांच्या आग्रहा खातर उद्या दिनांक 14 मे रोजी ते कोलाड परिसरातील विविध लग्न सोहळ्याला उपस्थित रहाणार आहेत सोबत मंत्री अदितीताई आमदार अनिकेतभाई सुद्धा उपस्थित रहाणार आहेत त्यामूळे यजमान जय्यत तयारीला लागले असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
Comments
Post a Comment